या प्रकरणात कंपनीचे संचालक प्रणव गुप्ता आणि विनीत गुप्ता यांच्यावर १६ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पॅराबोलिक ड्रग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने देशातील पाच शहरांमध्ये १७ ठिकाणी छापे टाकले आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीत ७ आणि मुंबईत ३ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. तसेच पंजाबमधील पंचकुला, अंबाला आणि चंदिगडमध्ये सात ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. Major action in parabolic drug case ED raids at 17 locations in five cities under PMLA
या प्रकरणात कंपनीचे संचालक प्रणव गुप्ता आणि विनीत गुप्ता यांच्यावर १६ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक केल्याचा आरोप आहे. दोघेही प्रसिद्ध अशोका विद्यापीठाच्या संस्थापक समितीचे सदस्य आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App