२० कामगार दबले गेले ढिगाऱ्यात सहा जणांचा शोध सुरू
विशेष प्रतनिधी
लुधियाना :Punjab पंजाबमधील लुधियाना येथील फोकल पॉइंटच्या फेज ८ मध्ये असलेल्या कोहली डाईंगमध्ये शनिवारी रात्री बॉयलरचा स्फोट झाला. बॉयलरचा स्फोट इतका जोरदार होता की आवाजामुळे दुमजली छताचा मागील भाग कोसळला. यामध्ये १५ ते २० कामगार त्याखाली दबले गेले.Punjab
या दुर्घटनेनंतर अर्ध्या तासाने, बाराहून अधिक कामगार ढिगाऱ्यातून बाहेर आले. त्यापैकी एकाचा पाय निकामी झाला होता. सहा जणांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तरी, अन्य सहा ते सात कामगार खाली दबले गेलेले आहेत त्यांचे बचावकार्य सुरू आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले. कॅबिनेट मंत्री हरदीप सिंग मुंडियन, डीसी जतिंदर जोरवाल आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह जिल्हा पोलिस अधिकारीही तेथे पोहोचले आणि बचाव कार्याची माहिती घेतली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App