मणिपूरमध्ये मैतेई उग्रवाद्यांनी चार जणांचे केले अपहरण, कुकी सैनिकाच्या कुटुंबातील तिघांचा समावेश!


  • चकमकीत दोन पोलिसांसह ९ जण जखमी

विशेष प्रतिनिधी

कांगचुप चिंगखोंग : मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील कांगचुप चिंगखोंग गावाजवळील एका चेकपॉईंटवर मैतेई उग्रवाद्यांनी मंगळवारी एक वाहन थांबवले आणि त्यात प्रवास करणाऱ्या चार कुकी लोकांचे अपहरण केले. यातील तीन जण एका सैनिकाच्या कुटुंबातील आहेत. यामध्ये सैनिकाच्या आईचाही समावेश आहे.Maitei militants abducted four people in Manipur including three from the family of a Kuki soldier

लोकांचे अपहरण झाल्याची बातमी पसरताच काही कुकी लोक हातात शस्त्रे घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कांगचूपच्या दिशेने गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दोन पोलीस आणि एका महिलेसह नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींना इंफाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 65 वर्षीय व्यक्ती या वाहनात प्रवास करत होती, घटनास्थळी उपस्थित सुरक्षा दलांनी तिचे अपहरण होण्यापासून वाचवले. मांगलून हाओकीप या नावाने त्या व्यक्तीची ओळख पटली आहे. त्यांना अनेक गंभीर दुखापती झाल्या, त्यामुळे त्यांना नागालँडमधील दिमापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेंगकिम (60), नीलम (55), जॉन थांगजिम हाओकिप (25) आणि जामखोटांग (40) अशी उर्वरित चार जणांची नावे आहेत. मंगळवारी रात्रीपर्यंत त्यांचे ठिकाण पोलिसांना शोधता आले नाही. त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत.

Maitei militants abducted four people in Manipur including three from the family of a Kuki soldier

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात