विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश 2022 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल अजून लागायचे आहेत. त्यातही गुजरातला दुसऱ्या टप्प्यातले मतदान अजून सुरूच आहे. पण असे असताना भाजपची मात्र 2023 च्या 9 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. यासाठीच भाजपच्या दिल्लीतल्या मुख्यालयात राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांची बैठक होत आहे. या बैठकीत राष्ट्रीय पातळीवरचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे संबोधन झाले आहे. पण 2023 च्या मिनी लोकसभा ठरतील अशा 9 राज्यांच्या निवडणुकांची भाजपची नेमकी स्ट्रॅटेजी काय ठरली आहे??, याची साधी भनकही मेन स्ट्रीम म्हणवणाऱ्या मीडियाला लागलेली दिसत नाही. Main stream media’s shortcomings : no sources could be developed in BJP for news licks or authentic news of real strategy of the party
बाकीच्या पक्षांमध्ये सोर्सेस
एरवी मेन स्ट्रीम मीडिया बाकीच्या राजकीय पक्षांमध्ये आपले सोर्सेस वापरून जोरदार बातम्या काढून त्यातल्या काही “निवडक” बातम्या देत असतात. त्यातून कोणत्या पक्षात अंतर्गत फूट आहे??, कोणत्या पक्षात किती बंडखोरी होणे अपेक्षित आहे??, बंडखोरांना चुचकारण्यासाठी कोणत्या पक्षाचे नेते कोणते हातखंडे अवलंबत आहेत?? वगैरे बातम्यांचा रतीब मीडिया घालत असतो. काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये विविध मीडिया चॅनेल्स आणि बडी वर्तमानपत्रे यांचे पक्के सोर्सेस असतात. ते सोर्सेसच मीडियाला आपल्या सोयीच्या बातम्या पुरवतात आणि त्या प्रसिद्ध करून घेतात. यातून किमान त्या पक्षांमध्ये अंतर्गत स्थिती निवडणुकीची तयारी निवडणुकीची काही प्रमाणात स्ट्रॅटेजी याची भनक मीडियाला लागते आणि मीडिया त्याच आधारावर बातम्या करत राहते. पण भाजपच्या बाबतीमध्ये हे मीडियाला शक्यच होत नाही.
2014 नंतरचा बदल
भाजपची कोणतीही स्ट्रॅटेजी, मग ती एखाद्या महापालिका निवडणुकीची असो अथवा देशातल्या सार्वत्रिक लोकसभेची निवडणूकीतली असो… लिक झालेली गेल्या कित्येक वर्षात सापडलेली नाही. मीडियाला या स्ट्रॅटेजीचे छोटे-मोठे घटक सापडतात आणि त्याच्याच ते बातम्या करतात. पण पक्ष म्हणून भाजपची एखादी स्ट्रॅटेजी मीडियाने आधी सांगितली आणि ती तशीच्या तशी अमलात आली हे निदान 2014 नंतर घडलेलेच दिसत नाही.
मराठी माध्यमांचे तोकडेपण
आताही मराठी माध्यमे शिवसेनेतली फूट, वंचित बहुजन आघाडीशी संभाव्य युती, महिला मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीतील संभाव्य मतभेद याच्या जोरदार बातम्या देतात. राहुल गांधींनी महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेत सावरकरांचा मुद्दा उपस्थित केल्यावर भारत जोडो यात्रेसाठी टीआरपी वाढवतात. पण भाजपच्या राज्यातल्या स्ट्रॅटेजीची मराठी माध्यमांना देखील पुसटशी कल्पनाही येत नाही.
शिंदेंची फूट कळलीही नाही
एरवी शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस मधले वेगवेगळे गट, काँग्रेस मधले गट यांच्या बातम्या सर्व मराठी माध्यमे देत असताना याच माध्यमांना विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे फुटणार आहेत, त्यांच्याबरोबर 40 आमदार असणार आहेत आणि राज्यात सत्तापालट होणार आहे, या बातम्यांची साधी भनकही लागली नव्हती. एकनाथ शिंदे महाराष्ट्राची सीमा ओलांडून सुरतच्या दिशेने गेल्यानंतर मराठी माध्यमांना जाग आली आणि त्यांनी ब्रेकिंग न्यूज चालवायला सुरुवात केली होती.
वेगळेच फुगे फुगवावे लागणार
जे महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांचे, तेच देशपातळीवर भाजपच्या बाबतीत सर्व माध्यमांचे झाले आहे. भाजपची राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक दिल्लीतल्या मुख्यालयात चालली आहे. पण भाजप तिथे निवडणुकीसाठी नेमकी कोणती स्ट्रॅटेजी ठरवणार?? वेगवेगळ्या 9 राज्यांच्या म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तेलंगण, छत्तीसगड, त्रिपुरा, मेघालय, नागालँड यांच्या विधानसभा निवडणुका नेमक्या कोणत्या चेहऱ्यावर लढवणार?? कोणते मुद्दे पुढे आणणार??, याची कोणतीही अधिकृत बातमी अथवा लिक झालेली बातमी माध्यमे देऊ शकलेली नाहीत.
त्यामुळे गुजरातमध्ये माध्यमांना जसा आम आदमी पार्टीचा फुगा फुगावा लागला, तसेच या 9 राज्यांच्या बाबतीमध्ये तिथल्या स्थानिक पातळीवरच्या पक्षांचा फुगा माध्यमांना फुगवावा लागणार आहे, हेच निदान आज 5 डिसेंबर 2022 रोजीचे चित्र दिसत आहे. मग भले माध्यमांनी फुगवलेले हे फुगे हवेत तरंगत अथवा हवेत उंच उडण्यापूर्वीच फुटोत. माध्यमांना भाजप मधली “खरी बातमी” काही मिळत नाही वस्तुस्थिती आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App