विधान परिषद निवडणुकीचा घोळ निस्तरायला महाविकास आघाडीला लागले 8 दिवस!!

प्रतिनिधी

मुंबई :  महाराष्ट्रात सत्ता बदल होऊन विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक लागल्यानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जो उमेदवारीचा घोळ झाला, तो निस्तरायला महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना तब्बल 8 दिवस लागले. काँग्रेसचे नेते सुधीर तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचा अर्ज दाखल करण्या ऐवजी आपला मुलगा सत्यजित तांबे याचा अपक्ष अर्ज दाखल करून घेतला. त्यानंतर नागपुरात देखील राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आणि सतीश इटकेलवार यांनी अर्ज दाखल केला. Mahavikas Aghadi took 8 days to clear the mess of Vidhan Sabha elections

12 जानेवारीला सुरू झालेला हा राजकीय घोळ निस्तरायला महाविकास आघाडीला 19 जानेवारी उजाडावा लागला. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून घेतले. यात संजय राऊत आणि नाना पटोले आघाडीवर होते राष्ट्रवादी काँग्रेस यात नामानिराळी राहिली पण राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांना टोले हाणून घेतले.

आज 19 जानेवारीला शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार नेमके कोण हे जाहीर केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे या पत्रकार परिषदेला हजर होते. या तीनही नेत्यांनी महाविकास आघाडीचे पाच उमेदवार जाहीर करून ते सर्व विजयी होतील असा दावा केला आहे.

यावेळी नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि कोकण विभागातील महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात आले. यामध्ये नागपूरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लिंगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुभांगी पाटील आणि कोकणातून बाळाराम पाटील हे अधिकृत उमेदवार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले आहे.



यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांनाही कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे. शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात नक्की येणार असून ते रुग्णालयात आहे लवकरच ते बाहेर येतील असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

बेरोजगारी आणि नोकरीत काम करणारे लोकं नाराज आहे, नाशिकमध्ये भाजपला साधा उमेदवार मिळाला नाही, स्वतःला मोठा पक्ष म्हणवून घेतो असे म्हणणाऱ्या पक्षाची अशी अवस्था झाल्याचा टोला पटोले यांनी लगावला आहे.

सत्यजित तांबे यांनी यापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांचे नाव घेतले होते, महाविकास आघाडीने भूमिका जाहीर केली आहे खाजगी भूमिका कुणाची नाही असेही गोंधळाची स्थिती असलेल्या जागेबद्दल स्पष्ट केले.

गोंधळ कुणी घडविला आणि कॉंग्रेस पक्षाची कोणी बदनामी केली, शुभांगी पाटील यांच्या प्रचाराला बाळासाहेब थोरात राहणार आहे, नाशिकमध्ये भाजपची काय ती स्पष्टता समोर येणार आहे, भाजप घर फोडण्याचे काम करत आहे ही स्पष्ट होत आहे असा आरोप पटोले यांनी केला आहे.

Mahavikas Aghadi took 8 days to clear the mess of Vidhan Sabha elections

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात