
विशेष प्रतिनिधी
मंत्रालयात दारूच्या बाटल्याचा खच आढळून आल्याने अवघ्या राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकारावरून आघाडी सरकारवर चौफेर टीका सुरू आहे. यावर भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.Mahavikas Aghadi government has nothing to do with Hindutva, alleges Darekar
राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला हिंदुत्वाच्या बाबतीत देणघेणं नाही! मंत्रालयाचे ‘मदिरा’लय करणाऱ्या आघाडी सरकारकडून मंदिरे उघडण्याबाबत भूमिका स्पष्ट होत नाही. एका बाजूला हे वाईन शॉप सुरू आहेत,
बार सुरू आहेत, अगदी मंत्रालयातही दारूच्या बाटल्याचा खर्च आढळला आहे. यांना मंदिरं सुरू करण्यात अडचण वाटतेय, या सरकारला हिंदुत्वाशी काहीही देणंघेणं नाही,” अशी टीका त्यांनी केली