महात्मा गांधींचा दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरी विरुद्ध लढा; पण त्यांच्या दिवट्या पणतीला कोट्यावधींच्या फसवणुकीबद्दल तुरुंगवासाची सजा!!

Ashish Lata Ramgobin

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महात्मा गांधींचा दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरी विरुद्ध लढा; पण त्यांच्या दिवट्या पणतीला कोट्यावधींच्या फसवणुकीबद्दल तुरुंगवासाची सजा!!, हे खरंच घडले आहे. महात्मा गांधींची पणती आशिष लता रामगोबिन हिने दक्षिण आफ्रिकेतल्या व्यावसायिकाची सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांची फसवणूक केली. त्याबद्दल तिला दक्षिण आफ्रिकेतल्या कोर्टाने 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली. Ashish Lata Ramgobin

महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरी विरुद्ध मोठा लढा उभारला. त्यामुळे त्यांना जागतिक कीर्ती लाभली. त्या उलट त्यांच्या दिवट्या पणतीने fraud आणि forgery करून आपल्या पणजोबांचा दिव्य वारसा स्वतःच्या हाताने घालवला.

महात्मा गांधी यांची पणती आशिष लता रामगोबिनला (56) हिने एका व्यवसायिकाची 3.22 कोटी रुपयांची फसवणूक केली. त्याबद्दल दक्षिण आफिक्रेतील डर्बनच्या न्यायालयाने तिला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात त्या 2015 पासून जामीनावर होती.

लता रामगोबिन या महात्मा गांधीजींच्या पणती असून प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या इला गांधी आणि मेवा रामगोबिन यांची कन्या आहेत. तसेच इला गांधी यांना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांत राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे.



दक्षिण आफ्रिकेतील मोठे उद्योजक एस. आर. महाराजांनी त्यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. महाराज यांच्याकडे न्यू आफ्रिका अलायन्स फूटवेअर वितरक नावाची कंपनी आहे. कंपनी पादत्राणे, कपडे आणि तागाचे आयात, विक्री आणि बनवण्याचा व्यवहार करते. त्यांची कंपनी इतर कंपन्यांना आर्थिक मदत देखील करते.

लिनेनचे 3 कंटेनर ऑर्डर करण्यासाठी मागितले होते पैसे आशिष लता रामगोबिनने 2015 मध्ये एस. आर. महाराजांची भेट घेतली. दरम्यान, त्यांनी भारतातून 3 लिनेनचे कंटेनर आणणार असल्याचे आश्वासन दिले. व त्याला दक्षिण आफ्रिकेपर्यंत कंटेनर आणण्यासाठी पैशाची गरज असल्याचे सांगितले. हे कंटेनर दक्षिण आफ्रिकेच्या हॉस्पिटल ग्रुप नेट केअरला दिले जाणार असून नेट केअर कंपनीशी संबंधित कागदपत्रेही त्यांनी एसआर महाराजांना दाखवली. नेट केअर कंपनीची कागदपत्रे आणि लता रामगोबिन यांचे कुटुंबीय पाहून महाराजांनी त्यांच्याशी व्यवहार करताना पैसे दिले. दोघांमध्ये नफा वाटून घेण्याचीही चर्चा होती. 2.68 लाख रुपये जमानतीसाठी जमा केले होते.

मात्र संबंधित प्रकरणात फसवणूकीचा खुलासा झाल्यानंतर कंपनीच्या संचालकांनी लताविरोधात कोर्टात खटला दाखल केला होता. लताविरूद्ध न्यायालयात 2015 मध्ये खटला सुरू झाला. सुनावणीदरम्यान, लता यांनी गुंतवणूकदाराला पटवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि चालान दाखवले राष्ट्रीय फिर्यादी प्राधिकरणाचे (एनपीए) ब्रिगेडिअर हंगवानी मुलौदजी म्हणाले. तागाचे कोणतेही कंटेनर दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले नसल्याचेदेखील ते म्हणाले. त्यामुळे 2015 मध्ये लताला 2.68 लाख रुपयाच्या जामिनावर सोडण्यात आले होते.

Mahatma Gandhi’s great grand daughter Ashish Lata Ramgobin Sentence to 7 year of jail in south africa

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात