महाराष्ट्राची ‘निरजा’ : बाहेर गोळ्यांचे आवाज येत होते -पण आम्ही मोहिम फत्ते केली ; भारतीयांना सुखरूप मायदेशी आनणारी अमरावतीची श्वेता

एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके ही हवाई सुंदरी सहभागी होती. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळत जीवाची पर्वा न करता भारतीयांना धैर्याने मायदेशी आणलं.


अफगाणिस्तानमध्ये अराजकता माजली आहे. देश सोडण्यासाठी जीवाच्या भीतीने अनेक नागरिक विमानतळाकडे धाव घेत आहेत. अनेकांनी विमानावर लटकून प्रवास करण्याचाही प्रयत्न केला. इतकी भयंकर परिस्थिती असतानाही अफगाणिस्तानातून भारतीयांना आपल्या मायदेशी सुखरुप आणण्यासाठी दर्यापूरची लेक श्वेता चंद्रकांत शंके आपल्या सहकाऱ्यांसोबत अफगाणिस्तानातील काबूलमध्ये गेली होती . Maharashtra’s ‘Nirja’: The sound of bullets was coming from outside – but we carried out the campaign; Shweta from Amravati who brings Indians home safely


विशेष प्रतिनिधी

अमरावती : अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या 129 भारतीय व इतर प्रवाश्यांना घेऊन एअर इंडियाच विमान भारतात दाखल झालं. ए आय 244 या विमानाने काबूल विमानतळावर बिकट परिस्थिती असताना उड्डाण घेतले. या एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके ही हवाई सुंदरी सहभागी होती. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळत जीवाची पर्वा न करता प्रवाशांना धैर्याने मार्गदर्शन करत129 भारतीयांना मायदेशी आणलं.

श्वेता शंकेच्या कामगिरीचं सध्या देशात कौतुक केलं जातंय. तिच्या आई वडिलांना श्वेताचा सार्थ अभिमान वाटतोय. अफगाणिस्तानमध्ये एअर इंडियाचं विमान पोहोचलं असताना विमानाला लँडिंग करु दिलं जात नव्हतं. मात्र काही वेळानंतर हे विमान काबूलच्या एअरपोर्टवर उतरलं आणि भारतीयांना सुखरुप परत देखील घेऊन आलं. एअर इंडिया विमानात कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. यामध्ये महाराष्ट्राची लेक श्वेताचा देखील समावेश आहे. श्वेताच्या आई-वडिलांना याचा सार्थ अभिमान देखील वाटतोय.



भारतातून पाठविलेल्या विमानात श्वेता ही हवाई सुंदरी म्हणून गेली होती. अतिशय बिकट परिस्थिती असताना देखील विमानाने उड्डाण घेतले आणि आज 129 भारतीयांना घेऊन विमान यशस्वीपणे भारतात दाखल झालं. श्वेता ही दर्यापूरमधील बाभळी येथील शिवाजी चौकात राहते…

अमरावतीच्या दर्यापूर इथे राहणारी श्वेता अफगाणिस्तानहून तिथल्या भारतीयांना सुखरुप परत आणण्याच्या मिशन मध्ये सामील होती. श्वेता आणि टीमने मोहिम फत्ते केली.सलाम या महाराष्ट्र कन्येला.

Maharashtra’s ‘Nirja’: The sound of bullets was coming from outside – but we carried out the campaign; Shweta from Amravati who brings Indians home safely

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात