विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आले दिल्लीच्या मना, तो मुख्यमंत्री नेमा!! ही महाराष्ट्राची कहाणी आहे. काँग्रेस पासून भाजपच्या राजवटीपर्यंत मधला शिवसेना – भाजप युतीचा अपवाद वगळला तर यात बदल झालेला नाही. तामिळनाडू, आंध्र या राज्यांचा अपवाद वगळला तर बाकी सगळ्या राज्यांची हीच कर्मकहाणी आहे आणि महाराष्ट्रात कोणीही कितीही महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नाही हा इतिहास आहे, असे फेसबुक अकाउंट वर किंवा बाकीच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले तरी वस्तूस्थिती बदलत नाही!!Maharashtra chief minister not from the mind of people, but from the mind of delhi highcommand
महाराष्ट्रात सध्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री या मुद्द्यावर राजकीय घमासान माजल्याच्या पार्श्वभूमीवर वर उल्लेख केलेली वस्तुस्थिती लिहिली आहे.
संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर किंवा त्याआधी मुंबई राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडीचा प्रश्न आल्यानंतर यशवंतराव चव्हाण हे दिल्लीच्या म्हणजे पंडित नेहरूंच्या मर्जीतले मुख्यमंत्री होते. त्यानंतर दिल्लीच्या मर्जीने मुख्यमंत्री नेमण्याची काँग्रेसमध्ये प्रथा परंपराच पडून गेली. ती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाच्या काळात अधिक घट्ट झाली आणि त्यानंतर राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव या काँग्रेसी पंतप्रधानांनी इंदिराजींचा कित्ता गिरवत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आपल्या मर्जीतले मुख्यमंत्री नेमले. त्यामुळे वसंतदादा पाटील अब्दुल रहमान अंतुले, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव पाटील निलंगेकर हे दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडने नेमलेले मुख्यमंत्री होते.
1995 ची भाजपची राजवट शिवसेना-भाजप युतीची राजवट त्याला थोडी अपवाद होती. कारण मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मनातले मुख्यमंत्री होते. त्यावेळी बाळासाहेब यांच्या मनात सुधीर जोशी यांचे नाव असल्याची त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण दिल्लीतून वाजपेयी – अडवाणी, महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या प्रत्यक्षष- अप्रत्यक्ष हस्तक्षेपातून मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले होते, तर बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री केले होते.
अगदी शरद पवारांचे 1978 चे मुख्यमंत्री पद देखील जनता राजवटीतल्या दिल्लीतल्या जनता पक्षाच्या नेत्यांच्या आशीर्वादाने आणि एस. एम. जोशी यांच्याकडे संधी आली असताना त्यांनी कच खाल्ल्याने आले होते. शरद पवार त्या अर्थाने “स्वयंभू” मुख्यमंत्री नव्हते. उलट १९७८ मध्येच वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारे नेते हा शिक्का त्यांच्यावर कायमचा बसला. आपल्या 50 – 55 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत शरद पवारांना स्वतःच्या मनातला मुख्यमंत्री नेमता आलेला नाही. उलट विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या पवारांच्या मनात नसलेल्या नेत्यांना दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री पदावर बसविले.
* उद्धव मुख्यमंत्रीपदावर सोनियांचा शिक्का*
उद्धव ठाकरे हे पवारांनी घोड्यावर बसविलेले मुख्यमंत्री होते. पण तेव्हा देखील उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावर पवारांना दिल्लीतून सोनिया गांधी यांच्या मर्जीचे शिक्कामोर्तब करून घ्यावे लागले होते.
* देवेंद्र मुख्यमंत्रीपदावर मोदींचा शिक्का*
2014 मध्ये भाजपच्या राजवटीत पवारांच्या मनात असलेला मुख्यमंत्री नेमण्याऐवजी भाजप श्रेष्ठींनी पवारांच्या मनात नसलेले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद दिल्लीकरांना सहन करावे लागले. पण त्यानंतर त्यांनी जी बाजी उलटवली, त्यामध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या मनातले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसविले. इथेही भाजपच्या राजवटीत दिल्लीची मर्जी सांभाळावी लागली.
त्यामुळे आज जरी अजितदादा पवार, पंकजा मुंडे यांचे बॅनर जरी जनतेच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून लागले असले तरी ते दिल्लीच्या मर्जीतले नेते आहेत का??, हा कळीचा सवाल आहे. त्याचबरोबर नितीन गडकरी आणि सुप्रिया सुळे हे जरी पवारांच्या मनातले मुख्यमंत्री असले तरी ते देखील दिल्लीच्या मर्जीतले मुख्यमंत्री आहेत का??, हा ही खरा सवाल आहे आणि जर ते तसे नसतील, तर ते मुख्यमंत्री होऊ शकतील का??, हा त्या पुढचा सवाल आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री नेमण्याचा इतिहास या सवालाचे नकारात्मक उत्तर देत आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App