प्रतिनिधी
उज्जैन : प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सनक’ अल्बमचे एक गाणे वादात सापडले आहे. महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांसह अनेक भाविकांनी गाण्यात भोलेनाथच्या नावासोबत अश्लील शब्द वापरल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. त्यांनी गाण्यातून देवाचे नाव काढून बादशाहला माफी मागण्यास सांगितले आहे. माफी न मागितल्यास बादशाहविरोधात उज्जैनसह अन्य शहरांमध्ये एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.Mahakal priest upset over rapper Badshah’s ‘Sanak’ album, adds obscene words to Mahadev’s name in song, files FIR
महाकाल मंदिराचे ज्येष्ठ पुजारी महेश पुजारी यांनी आरोप केला होता की, हिंदू सनातनमध्ये मिळालेल्या सूटचा गैरवापर होत आहे. अशा सर्व गोष्टींवर संत आणि कथावाचक मौन बाळगून आहेत. चित्रपट स्टार असो वा गायक, त्यांना देवाच्या नावाने अश्लीलता पसरवण्याचा अधिकार नाही. त्यांच्यावर देशभरात एकाच वेळी कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारे सर्वजण सनातन धर्माचे चुकीचे वर्णन करत राहतील, तर त्याला आमचा विरोध आहे. महाकाल सेना आणि पुजारी महासंघासह हिंदू संघटनांनी तत्काळ या गाण्यातून भगवान भोलेनाथांचे नाव हटवण्यास सांगितले आहे.
काय आहे वादग्रस्त भाग
बादशाहचे 2 मिनिटे 15 सेकंदांचे नवीन गाणे जोरदार ट्रेंड करत आहे. गाण्याच्या 40 सेकंदांनंतर गाण्याच्या शेवटी बोल आहेत, कभी सेक्स तो कभी ग्यान बाटता फिरूं… यानंतर अश्लील शब्दांचा वापर करून गाण्याचे बोल हिट पर हिट में मारता फिरूं… तीन-तीन रात में लगातार जागता, भोलेनाथ के साथ मेरी बनती है…. या गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत 18 लाख व्ह्यू मिळाले होते. या गाण्यावर अनेक सेलिब्रिटींनी रील्सही केले आहेत. हे गाणे खूप पसंत केले जात आहे, मात्र आता या गाण्यावर शिवभक्त संतापले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App