विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महादेव बेटिंग अॅप प्रकरणातील दोन मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या रवी उप्पलला दुबईत अटक करण्यात आली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या आवाहनावर इंटरपोलने जारी केलेल्या रेड नोटीसच्या आधारे दुबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी उप्पलला गेल्या आठवड्यात दुबईत ताब्यात घेण्यात आले होते.Mahadev Betting App Co Founder Arrested From Dubai Indian System In Touch With UAE Authorities
त्याला भारतात आणण्यासाठी EDचे अधिकारी दुबईच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. भारतातील छत्तीसगड आणि मुंबई पोलीस उप्पलविरुद्ध तपास करत आहेत. तर महादेव बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची ईडी चौकशी करत आहे. रवी हा महादेव अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरव चंद्राकरचा सहकारी आहे.
महादेव बुक अॅप सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म प्रदान करते. भारतात यावर बंदी घालण्यात आली आहे. पण हे इतर देशांमध्ये सुरू आहे. छत्तीसगडचा रहिवासी चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल दुबईतू हे चालवतात. या दोघांविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App