वृत्तसंस्था
गाजीपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायद्याचा बडगा चालवून बड्या बड्या माफिया डॉनना आडवे केले. त्याचेच प्रत्यंतर आज गाजीपूर कोर्टात आले. Mafia don Mukhtar Ansari broke down crying in court
गाजीपूर पीएएमएल कोर्टाने माफीया डॉन मुख्तार अन्सारीला गँगस्टर एक्ट अंतर्गत 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली. त्याला 5 लाखांचा दंड ठोठावला. त्यावेळी मिशा पिळणारा मुख्तार अन्सारी भर कोर्टात रडत आडवा पडला. न्यायाधीशांनी सुनावलेली शिक्षा त्याला सहनच झाली नाही. 2005 पासून मी तुरुंगात आहे. माझा कुठल्याही गँगशी काहीही संबंध उरला नाही, असे तो रडत न्यायाधीशांना म्हणत राहिल्याचे चित्र कोर्टात निर्माण झाले. पण पोलिसांनी त्याला उचलून आधी बाकावर बसवले आणि नंतर त्याला घेऊन ते जेलमध्ये गेले. त्याला बराकीत बंद केले.
एकेकाळी हाच मुख्तार अन्सारी माफिया डॉन बनून कधी समाजवादी पार्टी, तर कधी बहुजन समाज पार्टी याचा आमदार – खासदार व्हायचा सर्वसामान्य नागरिकांच्या मुंड्या पिरगळून त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता लुटायचा. या लुटलेल्या मालमत्तेतूनच त्याने मऊ मध्ये मोठे साम्राज्य निर्माण केले. ते साम्राज्य योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या बुलडोझरने आणि कायद्याच्या बडग्याने उद्ध्वस्त तर केलेच, पण आता याच मुख्तार अन्सारीवर भर कोर्टात शिक्षा सुनावताच आडवा पडून रडायची वेळ आली.
मुख्तार अन्सारीला आधी दोन प्रकरणांमध्ये वेगवेगळे शिक्षा झालीच आहे. तो ती शिक्षा भोगत आहे. 2017 पूर्वी तो पंजाबच्या लुधियाना जेलमध्ये होता. त्यानंतर त्याला उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्यात आले सध्या त्याला गाजीपूर जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App