वृत्तसंस्था
भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेस बिलकुलच निवडणूक लढवत नाहीए, तर त्यांचे नेते स्वतःच्या मुलांनाच सेट करण्याच्या नादात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांना मध्य प्रदेशची निवडणूक जिंकायचीच नाही, तर काँग्रेसवर कब्जा करायचा आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या प्रचार सभेत काँग्रेसला लगावला. Madhya Pradesh Congress leaders are innocent of setting their own children
विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीमध्ये मोठी गर्दी जमत आहे. अशाच एका प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसमध्ये गटबाजीवर जोरदार प्रहार केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले :
काँग्रेस मध्य प्रदेशात खरी निवडणूकच लढवत नाही. कारण त्या पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे की मध्य प्रदेशात आपली डाळ शिजणार नाही. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार येणार आहे. पण काही काँग्रेस नेते निवडणुकीच्या मैदानात यासाठी उतरले आहेत, कारण त्यांना आपापल्या मुलांचे राजकीय सेटिंग करायचे आहे. त्यामुळे ते मध्य प्रदेशला “अपसेट” करत आहेत.
#WATCH मध्य प्रदेश: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, "मध्य प्रदेश में कांग्रेस चुनाव नहीं लड़ रही है। उसे मालूम है कि यहां चुनाव जीतना नहीं है, वह तो चुनाव लड़ने का ढोंग कर रही है…वे तो इसलिए चुनाव लड़ रहे हैं कि आगे चलकर किसका बेटा कांग्रेस का मुखिया बनेगा…यहां के दो बड़े… pic.twitter.com/YZylyefV5v — ANI_HindiNews (@AHindinews) November 5, 2023
#WATCH मध्य प्रदेश: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, "मध्य प्रदेश में कांग्रेस चुनाव नहीं लड़ रही है। उसे मालूम है कि यहां चुनाव जीतना नहीं है, वह तो चुनाव लड़ने का ढोंग कर रही है…वे तो इसलिए चुनाव लड़ रहे हैं कि आगे चलकर किसका बेटा कांग्रेस का मुखिया बनेगा…यहां के दो बड़े… pic.twitter.com/YZylyefV5v
— ANI_HindiNews (@AHindinews) November 5, 2023
मध्य प्रदेश मधले काँग्रेसचे दोन बडे नेते आपापल्या मुलांची राजकीय प्यादी पुढे सरकवण्याच्या नादात आहेत. त्यांना मध्य प्रदेशात काँग्रेसला जिंकून आणायचे नाही, तर आपापल्या मुलांकडे मध्य प्रदेश काँग्रेसचा कब्जा द्यायचा आहे. आपापल्या मुलांना काँग्रेसचे मुख्य बनवायचे आहे. त्यांची लढाई स्वतःच्या मुलांपुरतीच आहे. आता जे स्वतःच्या मुलांपुरतीच लढाई लढतात, त्यांना मध्य प्रदेशाच्या तरुण मुलांच्या भवितव्याशी काही कर्तव्य तरी आहे का??, असा बोचरा सवाल पंतप्रधान मोदींनी केला.
कमलनाथ विरुद्ध दिग्विजय सिंह; नकुल नाथ विरुद्ध जयवर्धन सिंह
मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह आपापल्या मुलांना मुलांची राजकीय प्यादी पुढे सरकवण्याच्या नादाला लागले आहेत. कमलनाथ यांना आपला मुलगा नकुल नाथ याला मुख्यमंत्री बनवायचे आहे, तर दिग्विजय सिंह यांना आपला मुलगा जयवर्धन सिंह याला मुख्यमंत्री करायचे आहे. पण काँग्रेस हायकमांड या दोन्ही नेत्यांच्या आग्रही मागण्यांना ताकास तूर लागू देत नाही. याचाच बोचरा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला टोला हाणला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App