यूपीत लव्ह जिहाद, तो देखील पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करून…!!; अबिद हवारीला पोलीस कोठडीची हवा

वृत्तसंस्था

लखनौ – उत्तर प्रदेशात लव्ह जिहादचा एक वेगळा प्रकार समोर आला आहे. अबिद हवारी नावाच्या व्यक्तीने एका हिंदू महिलेला फसवून तिच्याशी लग्न करायचा प्रयत्न केला. तो देखील स्वतः पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करून. संबंधित महिलेने धाडसाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि आता अबिद हवारी हा पोलीस कोठडीची हवा खातोय. Lucknow man arrested under UP’s anti-conversion law

उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू झाल्यानंतर त्या कायद्यानुसार अबिद हवारी याच्या विऱोधात कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. गाझीपूरचे एसीपी सुनील कुमार यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. अबिदने स्वतःचे नाव आदित्य सिंग असे सांगून आपण उत्तर प्रदेश पोलीसांत पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असल्याची बतावणी करून संबंधित महिलेला फसविले. त्याने तिच्याशी संबंध ठेवून विडिओ काढले आणि नंतर तिला विडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे धर्मांतर करून लग्न लावण्यासाठी बळजबरी केली.

अबिद हवारी हा आधीच विवाहित असून त्याला ७ अपत्ये आहेत. फेब्रुवारी २०२१ मध्येच त्याने आणखी एका हिंदू महिलेशी विवाह केला आहे, असे संबंधित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. पोलीस या प्रकरणाचा छडा लावत आहेत. पोलीसांनी अबिद हवारीला लव्ह जिहाद विरोधी कायद्यानुसार अटक केली असून तो सध्या कोठडीत आहे, अशी माहितीही सुनील कुमार यांनी दिली.

Lucknow man arrested under UP’s anti-conversion law

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात