लखनऊ लव्ह जिहाद : सुफियानने चौथ्या मजल्यावरून फेकलेल्या निधी गुप्ताचा मृत्यू; सुफियान फरार

वृत्तसंस्था

लखनऊ : आफताब अमीन पूनावाला आणि श्रद्धा वालकर यांच्या लव्ह जिहादची निर्घृण केस ताजी असतानाच उत्तर प्रदेशातून लव्ह जिहादचा असाच भयानक मामला समोर आला आहे. सुफियान याने निधी गुप्ता हिला आपल्या घराच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकल्याने तिचा मृत्यू झाला आहे. सुफियानवर ती प्रेम करत नव्हती, पण सुफियान तिच्या मागे लागला होता आणि तो तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणत होता, असा आरोप निधी गुप्ताचे वडील रवी गुप्ता यांनी केला आहे. Lucknow Love Jihad : Death of Nidhi Gupta thrown from fourth floor by Sufiyan; Sufiyan absconded

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या दुबग्गा परिसरात ब्लॉक 41 मध्ये गुप्ता परिवार राहतो. सुफियानचा परिवार ब्लॉक 40 मध्ये राहायचा. निधी गुप्ता (19) आणि सूफियानचा यांच्यात प्रेम संबंध असल्याचे बोलले जाते. हे समजताच निधीचे कुटुंबीय सुफियानच्या घरी पोहोचले. सुफियानशी त्यांचा वाद झाला. त्या वादातून निधी चौथ्या मजल्यावर पोहोचली. सुफियानही तिच्या पाठोपाठ चौथ्या मजल्यावर पोहोचला आणि त्याने निधीला खाली फेकले. गुप्ता परिवाराने तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे तिचा मृत्यू झाला.

ही घटना घडताच आरोपी सुफियान घराला कुलूप लावून आपल्या परिवारासह फरार झाला आहे. निधीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर सुफियानवर उत्तर प्रदेश पोलीसांनी जबरदस्ती धर्मांतरासाठी दबाव आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

निधी गुप्ता एका ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. सुफियान तिच्या मागावर असायचा. तो तिचे ब्रेन वॉशिंग करायचा. सूफियानने निधीला मोबाइल दिला होता. तो तिच्यावर इस्लाम मध्ये धर्मांतरासाठी दबाव आणत होता. गुप्ता परिवाराने सुफियानच्या परिवाराला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण सुफियानच्या परिवार काही ऐकून घ्यायला तयार नव्हता. यातून वाद वाढला आणि निधी चौथ्या मजल्यावर पोहोचली. सुफियान तिच्या पाठोपाठ गेला. वर जाऊन त्याने निधीला खाली फेकले. आम्ही वर जाऊन पोहोचेपर्यंत तो आम्हाला धक्का देऊन पळून गेला, असे निधीच्या वडिलांनी सांगितले.

सुफियान आपल्या परिवारासह फरार झाल्यानंतर लखनऊ पोलिसांनी 3 टीम तयार केल्या असून विविध ठिकाणी सुफियानचा शोध घेतला जात आहे. गेल्या दीड वर्षापासून सुफियान हा निधीच्या मागावर असल्याचा आरोप त्याच्या आईने देखील केला आहे त्याचबरोबर सोफियान नेहमी गुप्ता परिवाराला मारहाण करण्याची धमकी द्यायचा इतकेच नाही तर गुप्ता परिवारात निधीच्या मामाला त्याने कार पेटवून देण्याची ही धमकी दिली होती असे गुप्ता परिवाराने नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आफताब अमीन पूनावाला आणि श्रद्धा वालकर यांच्यातील लहुजी भयानक केस ताजी असताना लखनऊ मधून हा दुसरा मामला समोर आला आहे.

Lucknow Love Jihad : Death of Nidhi Gupta thrown from fourth floor by Sufiyan; Sufiyan absconded

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात