प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील लुलू मॉलमध्ये लव्ह जिहादचा नवा प्रकार समोर आला आहे. मॉलमध्ये नमाज अदा केल्याप्रकरणी अखिल भारतीय हिंदू महासभेने सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करू नये, असा इशारा दिला आहेच. पण त्याच वेळी या माॅलमध्ये नोकर भरतीचा नवा पॅटर्न समोर आला आहे आणि हाच पॅटर्न लव्ह जिहादला चिथावणी देणारा ठरत आहे. येथे 70 % मुस्लिम मुलांना आणि 30 % हिंदू मुलींना नोकऱ्या देऊन लव्ह जिहाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा, गंभीर आरोप करण्यात आला आहे. Love Jihad in Lucknow Mall; Hindu girls are targeted by job pattern
अखिल भारतीय हिंदू महासभेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करता येणार नाही, जर लुलू माॅलमध्ये पुन्हा नमाज अदा केली गेली, तर त्याच्या निषेधार्थ आंदोलने केली जातील. तसेच, माॅलमध्ये हनुमान चालिसाचे पठणही करण्यात येईल, असे या पत्रकात म्हटले आहे.
लुलू मॉलवर बहिष्कार टाकण्याची मागणी
हिंदू महासभेने हिंदू समाजाने सनातन धर्माच्या लोकांनी लुलू मॉलवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याची विनंती केली आहे. तसेच, सर्वसामान्यांकडूनही या माॅलवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.
मॉलवर गंभीर आरोप
या माॅलमध्ये 70 % मुस्लिम मुलांना तर 30 % हिंदू मुलींना नोकऱ्या दिल्या जातात. जेणेकरून येथे लव्ह जिहादचे प्रमाण वाढवता येईल, असा गंभीर आरोपही या माॅलवर करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App