”भगवान राम केवळ हिंदुंचे नाहीत, ते….” ; फारुख अब्दुल्लांचं विधान!

अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिली प्रतिक्रिया


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्यांचे अभिनंदन केले आणि म्हटले की, भारतात बंधुभाव कमी होत आहे आणि त्याला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे.Lord Ram is not only for Hindus he belongs to everyone in the world Farooq Abdullahs statement



शनिवारी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री म्हणाले की, अयोध्यात राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. मी त्या प्रत्येकाचे अभिनंदन करू इच्छितो ज्यांनी मंदिरासाठी प्रयत्न केले, ते आता तयार आहे. प्रभू राम हे केवळ हिंदूंचे नाहीत, ते जगातील प्रत्येकाचे आहेत. यावर त्यांनी भर दिला.

ते म्हणाले की, मी संपूर्ण देशाला सांगू इच्छितो की प्रभू राम केवळ हिंदूंचे नाही; ते जगातील सर्व लोकांचे आहेत. ते जगभरातील सर्व लोकांचे स्वामी आहे. अब्दुल्ला पुढे म्हणाले की, भगवान राम यांनी बंधुता, प्रेम, एकता आणि एकमेकांना मदत करण्याचा संदेश दिला आहे.

Lord Ram is not only for Hindus he belongs to everyone in the world Farooq Abdullahs statement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात