राहुल गांधींना आणखी एक धक्का; खासदारकी रद्द झाल्यानंतर आता लोकसभा हाऊस कमिटीने बजावली नोटीस!

Rahhul Gandhi New

जाणून घ्या, नेमकी कशाबद्दल बजावली गेली आहे नोटीस आणि याचा काय होणार परिणाम?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे केरळच्या वायनाडमधील खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल अपमानास्पद टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच,  राहुल गांधींना गुजरातच्या सुरत कोर्टात मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर कायद्यानुसार त्यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे.  याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे नेते, कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली जात आहे. अशातच आता राहुल गांधींना आणखी एक धक्का बसला आहे. लोकसभा हाऊस कमिटीने त्यांना नोटीस बजावली आहे. Lok Sabha Secretariat gives notice to Congress leader Rahul Gandhi to vacate government bungalow

लोकसभा हाऊस कमिटीने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. या नोटीसद्वारे राहुल गांधी यांचं शासकीय निवासस्थान रिकामं करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना दिल्लीतील शासकीय बंगला रिकामा करावा लागणार आहे.


‘’…हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आमदारांच्या शरणागतीचा परमोच्च बिंदू होता’’ ; शिंदे-फडणवीसांचा घणाघात!


कोणताही खासदार अपात्र ठरला तर लोकसभा हाऊस कमिटीकडून नोटीस दिली जाते. याचाच एक भाग म्हणून लोकसभा हाऊस कमिटीने राहुल गांधींना शासकीय बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावली आहे.

याशिवाय, काँग्रेस नेते राहुल गांधी पत्रकारपरिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजपाने राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

Lok Sabha Secretariat gives notice to Congress leader Rahul Gandhi to vacate government bungalow

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात