Waqf Amendment Bill : 12 नव्हे, तब्बल 14 तासांची चर्चा, गरीब मुसलमानांचा फायदा, Waqf सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : विरोधकांनी आठ तासांची चर्चा नामंजूर करून 12 तासांची चर्चा मागितली होती, पण लोकसभेमध्ये Waqf सुधारणा विधेयकावर तब्बल 14 तासांची चर्चा झाली आणि काल मध्यरात्री लोकसभेने बहुमताने waqf board सुधारणा विधेयक मंजूर केले. विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मते पडली.

Waqf सुधारणा कायद्याला काँग्रेस सह सगळ्या विरोधकांचा पूर्वीपासूनच ठाम विरोध होता. संसदीय समिती मध्ये देखील त्यांनी तो विरोध लेखी स्वरुपात नोंदवला होता, पण तरी देखील भाजप आणि सत्ताधारी NDA यांचे पूर्ण बहुमत असल्याने waqf सुधारणा विधेयक मंजूर होण्यामध्ये कुठली अडचण आली नाही. लोकसभेत अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू यांनी विधेयक मांडले. त्यावेळी सविस्तर भाषण करून त्यांनी संबंधित विधेयकाद्वारे गरीब मुस्लिमांचा कसा फायदा होईल, waqf गरीब मुस्लिम आणि महिला यांचा सहभाग कसा वाढेल, हे स्पष्ट केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी Waqf गैर मुस्लिम यांच्या समावेशाविषयी सगळे गैरसमज दूर केले होते, तरी देखील विरोधकांचे समाधान झाले नाही. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तर महात्मा गांधींचा आव आणत सभागृहात waqf सुधारणा कायद्याच्या कागदी प्रत फाडून टाकली.

Waqf सुधारणा वरील विधेयकाच्या चर्चेला किरण रिजिजू यांनी उत्तर दिले. त्यानंतर मतदान प्रक्रियेद्वारे लोकसभेने विधेयक मंजूर केले. यामध्ये विधेयकाच्या बाजूने 288 तर, विरोधात 232 मते पडली. विरोधकांच्या सगळ्या दुरुस्ती सूचना लोकसभेने बहुमताने फेटाळल्या.

काल विधेयकावरच्या चर्चेत सर्व पक्षांचे लोकसभेतले गटनेते बोलले यामध्ये गृहमंत्री अमित शाह, समाजवादी पार्टीचे लक्षणे ते खासदार अखिलेश यादव यांच्यापासून सर्व पक्षांच्या गटनेत्यांच्या समावेश होता, पण राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सुप्रिया सुळे यांनी या चर्चेतून पलायन केले. राहुल गांधींनी लोकसभेत तोंड उघडले नाही पण नंतर सोशल मीडिया हँडल वरून waqf सुधारणा विधेयकावर आगपाखड केली.

लोकसभेत Waqf सुधारणा विधेयकाच्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव, उबाठा शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गटनेते श्रीकांत शिंदे, द्रविड मुन्नेत्र कळघमचे गटनेते ए. राजा, तृणमूल काँग्रेसचे गटनेते सुगत राय, तेलगू देशमचे गटनेते श्रीकृष्ण देवरायलू, जनसेना पक्षाचे गटनेते तेंगला श्रीनिवास, जेडीयूचे गटनेते लल्लन सिंह हे सर्वजण बोलले. त्यांनी आपापली मते आग्रहाने लोकसभेमध्ये मांडली. त्यामध्ये प्रत्येक पक्षाने आपापली विशिष्ट भूमिका सदनात समजावून सांगितली.

या अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चेमध्ये काँग्रेसकडून लोकसभेतले उपनेते गौरव गोगोई यांनी बाजू मांडली. त्यानंतर ज्येष्ठ खासदार वेणुगोपाल हे देखील बोलले. परंतु, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी या चर्चेमध्ये बोलले नाहीत. राहुल गांधी काही काळ चर्चेच्या दरम्यान सदनामध्ये हजर होते, पण त्यांनी संबंधित विधेयकावर तोंड उघडले नाही. प्रियांका गांधी सदनामध्ये आज दिसल्या नाहीत. वंचित बहुजन आघाडीने या मुद्द्यावर राहुल आणि प्रियांका गांधी यांना चिमटे काढले.

त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया सुळे आज दिवसभर लोकसभेत हजर होत्या, पण गटनेते पदावर असून देखील त्या waqf सुधारणा विधेयकावर राष्ट्रवादीकडून बोलल्या नाहीत, तर तरुण खासदाराला आम्ही पक्षातर्फे संधी देतो, या नावाखाली त्यांनी खासदार निलेश लंके यांना आज बोलायला लावले.

एरवी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सुप्रिया सुळे हे तिन्ही नेते छोट्यातल्या छोट्या विषयांवर संसदेत आणि संसदेबाहेर बोलत असतात. परंतु, waqf board सुधारणा या देशहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयावर त्यांनी लोकसभेमध्ये तोंडही उघडले नाही. चर्चेच्या पहिल्या दिवशी तरी त्यांनी त्यापासून पलायन केले.

Lok Sabha passes Waqf Amendment Bill after marathon, heated debate

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात