भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे
विशेष प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीची ब्लू प्रिंट तयार केली आहे. पक्षाने दक्षिणेकडील राज्ये, ओडिशा आणि पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षाच्या अखेरीस किमान १०० रॅली घेतील आणि ज्या राज्यांमध्ये पक्षाला आपली पोहोच वाढवायची आहे तेथे मोठ्या प्रकल्पांची घोषणा करतील. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपची ब्ल्यू प्रिंट जवळपास तयार असल्याची माहिती समोर आली आहे.Lok Sabha Election 2024 BJP blue print ready Modis 100 rally Special focus on PM South Odisha Bengal
अनेक राज्यांमध्ये मेगा प्रोजेक्ट्स जाहीर होतील –
प्राप्त माहितीनुसार, पंतप्रधान मोदी वर्षाच्या अखेरीस नवीन कार्यक्रम सुरू करण्यासाठी आणि प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी रॅलींना संबोधित करतील. याशिवाय ज्या राज्यांमध्ये भाजपला आपला आवाका वाढवायचा आहे, त्या ठिकाणी विशेष योजनांचीही घोषणा केली जाणार आहे. भाजपने महिला आणि अल्पसंख्याकांसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये महिला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यासाठी असलेल्या केंद्रीय योजनांचा प्रचार करणे हे महिला मोर्चाचे काम आहे. त्याचवेळी, अल्पसंख्याक आघाडीने दहा राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील सुमारे ६० लोकसभा मतदारसंघांची यादी तयार केली आहे, जिथे अल्पसंख्याकांची संख्या लोकसंख्येच्या ३० टक्के आहे.
त्रिपुरामध्ये साहा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार : पीएम मोदी आणि अमित शहादेखील राहणार उपस्थित
तीन सदस्यीय समितीची स्थापना –
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ज्येष्ठ नेते सुनील बन्सल, विनोद तावडे आणि तरुण चुघ यांचे त्रिसदस्यीय पॅनल विविध आघाड्या आणि आमदारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवणार आहे. कार्यक्रमांमध्ये काही बदल आवश्यक असल्यास त्याबाबत सूचना दिल्या जातील याचीही समिती नोंद घेईल. ही समिती सर्वांगीण देखरेखीची जबाबदारी सांभाळणार असून पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांना वैयक्तिक राज्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की कोणत्याही मुद्द्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची खात्री करण्यासाठी विविध स्तरांवर तयारीचे निरीक्षण केले जाईल. “दक्षिण राज्ये, ओडिशा आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांवर विशेष लक्ष दिले जाईल,” असे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले आहे.
या राज्यांवर विशेष असणार विशेष लक्ष –
भाजप मध्य प्रदेशसारख्या राज्यात आपले संघटन आणखी मजबूत करण्यावर भर देत आहे, जिथे निवडणूक वर्चस्व सुनिश्चित करण्यासाठी मजबूत पक्ष रचना अपेक्षित आहे, परंतु तेलंगणासाठी पक्षाची रणनीती वेगळी आहे. सूत्रांनी सांगितले की, पक्ष नेतृत्व तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करत आहे. “भाजपला ओडिशा आणि पश्चिम बंगालसारख्या पूर्वेकडील राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत आपला मतांचा टक्का वाढवायचा आहे, येथे रणनीती वेगळी असेल,” असे नेते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App