विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भारतातील नागालँडमधील ‘किंग चिली’ उर्फ ‘भूत जोलकिया’ या नावाने ओळखली जाणारी मिर्ची पहिल्यांदाच लंडनच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे.लोकल मार्केटमधून ही मिर्ची थेट ग्लोबल मार्केट मध्ये पोहचली आहे .पंतप्रधान मोदी नेहमीच लोकल उत्पादनांना ग्लोबल बाजारपेठेत पाठवण्यासाठी प्रोत्साहन देतात .आता ह्या मिर्चीने देखील अशीच लंडनची बाजारपेठ गाठली आहे .
तिखटपणासाठी ही मिरची प्रसिद्ध आहे. ही जगातील सर्वात तिखट मिर्ची असल्याचे सांगितले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खास ट्विट
Wonderful news. Only those who have eaten the Bhoot Jolokia will know how spicy it is!https://t.co/G1nUWq3uw8 https://t.co/eJ4Pw1ymq3 — Narendra Modi (@narendramodi) July 28, 2021
Wonderful news.
Only those who have eaten the Bhoot Jolokia will know how spicy it is!https://t.co/G1nUWq3uw8 https://t.co/eJ4Pw1ymq3
— Narendra Modi (@narendramodi) July 28, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, अतिश्य उत्तम बातमी. ज्या लोकांनी भूत जोलकिया मिरची खाल्ली आहे त्यांनाच या मिरचीच्या तिखटपणाची कल्पना आहे. तर वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनीही ईशान्य भारतातील मिरची लंडनमध्ये पोहोचल्याचे म्हटले आहे.
Scoville हीट यूनिट (SHUs) नुसार भूत जोलकिया ही जगातील सर्वात तिखट मिरची आहे. 2008 साली ही मिरची प्रमाणित करण्यात आली होती. जुलै 2021 मध्ये लंडनमध्ये या मिरचीचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर लंडनमधून या मिरचीसाठी ऑर्डर आली. ही मिरची पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने पिकवण्यात आली आहे. ही मिरची लवकर खराब होत असल्याने तिची निर्यात करण्यात अनेक समस्या होत्या. मात्र, या सर्व अडचणींवर मात करुन नागालँड कृषी बाजार समितीने ही मिरची लंडनमध्ये पाठवली.
ही मिर्ची गुवाहाटीमधून पाठवण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App