List of top 10 colleges : देशातील टॉप 10 महाविद्यालये आणि विद्यापीठांची यादी जाहीर: NIRF रँकिंग 2025

top 10 colleges

 

दिल्ली : List of top 10 colleges : शिक्षण मंत्रालयाने नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी फ्रेमवर्क (NIRF) अंतर्गत देशातील सर्वोत्तम 10 विद्यापीठे आणि महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. ही क्रमवारी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी योग्य संस्था निवडण्यात मार्गदर्शन करते. अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतवैद्यकीय, फार्मसी आणि इतर क्षेत्रांमधील उत्कृष्ट शिक्षण संस्था निवडण्यासाठी NIRF रँकिंग विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे साधन ठरते.

या वर्षीच्या NIRF क्रमवारीत दिल्लीतील हिंदू कॉलेजने पहिले स्थान कायम राखले आहे, तर मिरांडा हाऊसने दुसरे स्थान मिळवले आहे. काही संस्थांनी आपली गतवर्षीची क्रमवारी टिकवली, तर काहींनी उल्लेखनीय प्रगती केली आहे. काही संस्थांची क्रमवारी खालीही घसरली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या टॉप 10 यादीत महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ किंवा महाविद्यालय नाही.



NIRF रँकिंग तयार करताना संस्थांमधील पायाभूत सुविधा, विद्यार्थी संख्या, संशोधनाची गुणवत्ता, पदवीधर विद्यार्थ्यांचे प्रमाण आणि त्यांचे अनुभव यासारख्या निकषांचा विचार केला जातो. या सर्वेक्षणाद्वारे देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची क्रमवारी ठरवली जाते.

NIRF 2025: टॉप 10 महाविद्यालये आणि विद्यापीठे

1. हिंदू कॉलेज, दिल्ली
2. मिरांडा हाऊस, दिल्ली
3. हंसराज कॉलेज, दिल्ली
4. किरोडीमल कॉलेज, दिल्ली
5. सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली
6. रामकृष्ण मिशन विवेकानंद महाविद्यालय, पश्चिम बंगाल
7. आत्माराम सनातन धर्म कॉलेज, दिल्ली
8. सेंट झेवियर्स कॉलेज, पश्चिम बंगाल
9. एसआरजी कृष्णमल महिला महाविद्यालय, तमिळनाडू
10. पीएसजी कला आणि विज्ञान महाविद्यालय, तमिळनाडू

List of top 10 colleges and universities in the country announced: NIRF Ranking 2025

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात