वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम : Liberian Ship केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी लायबेरियन जहाज एमएससी एल्सा ३ ची सिस्टर शिप एमएससी अकिकेता २ जप्त करण्याचे आदेश दिले. एमएससी एल्सा ३ हे मालवाहू जहाज २५ मे रोजी कोची किनाऱ्याजवळ बुडाले. दोन्ही जहाजे एमएससी मेडिटेरेनियन शिपिंग कंपनीची आहेत.Liberian Ship
जहाज बुडण्यामुळे झालेल्या पर्यावरणीय आणि आर्थिक नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी केरळ सरकारने याचिका दाखल केली होती. तसेच जहाज जप्त करण्याची मागणी केली होती, तसेच हे जहाज भारताबाहेर जाऊ शकते अशी भीती व्यक्त केली होती.Liberian Ship
त्याला उत्तर म्हणून न्यायालयाने हा आदेश दिला आहे. राज्य सरकारने ९५३१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. यामध्ये प्रदूषण नियंत्रण आणि मदत कार्याचा खर्च तसेच मच्छिमारांना झालेल्या नुकसानीची भरपाई समाविष्ट आहे.
कंपनी भरपाईची रक्कम जमा करेपर्यंत जहाज जप्त ठेवावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. प्रकरणाचे निराकरण होईपर्यंत जहाज भारताबाहेर जाऊ शकणार नाही.
विझिंजम बंदराला जहाज ताब्यात घेऊन त्याचे संरक्षण करण्याचे निर्देश
केरळ सरकारच्या म्हणण्यानुसार, जहाज बुडाल्यानंतर सोडण्यात आलेल्या विषारी पदार्थांमुळे डॉल्फिन आणि व्हेलसह अनेक सागरी प्राणी मृत्युमुखी पडले. यावर सरकारने अॅडमिरल्टी (ज्युरिडिक्शन अँड सेटलमेंट ऑफ मेरीटाइम क्लेम्स) कायद्याच्या कलम ४ अंतर्गत भरपाईची मागणी केली.
यामध्ये प्रदूषणासाठी ₹८६२६ कोटी, पर्यावरणासाठी ₹३७८.४८ कोटी आणि मच्छिमारांना झालेल्या नुकसानीसाठी ₹५२६.५१ कोटींचा समावेश आहे. व्याजासह एकूण भरपाईची रक्कम ₹९,५३१.११ कोटी आहे.
न्यायालयाने अदानी विझिंजम पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडला जहाज जप्त करून त्याचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने असेही स्पष्ट केले की या आदेशामुळे माल लोडिंग किंवा अनलोडिंगमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० जुलै रोजी होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App