नाशिक : पहलगाममध्ये इस्लामी जिहादी दहशतवाद्यांनी 28 भारतीयांची हत्या केली. त्यात त्यांनी धर्म विचारून 27 हिंदूंना गोळ्या घातल्या. त्याआधी त्यांना कलमा पढायला लावला. दहशतवाद्यांनी त्यांच्या पॅंटी उतरवून त्यांची सुंता केली की नाही हे पाहिले. दहशतवाद्यांच्या या घृणास्पद कृत्याला विरोध करणाऱ्या एका कश्मिरी मुसलमानाचीही दहशतवाद्यांनी हत्या केली. Pakistani propaganda
पण या सगळ्यात लिबरल पुरोगाम्यांनी आणि माध्यमांनी मात्र काश्मिरियत, इन्सानियत असे शाब्दिक खेळ करून मुस्लिमांनी केलेल्या मदत कार्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर चालवली. मदत करणाऱ्या मुसलमानांचे व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल केले. दहशतवाद्यांचा जिहादी धर्म या विषयाची चर्चा कार्पेट खाली टाकून दिली.
दहशतवाद्यांनी आम्हाला धर्म विचारून आमच्यातल्या पुरुषांना गोळ्या घातल्या. हे तिथे भयानक हिंसाचार अनुभवलेल्या सर्व कुटुंबीयांनी जाहीरपणे सांगितले. त्याचे हजारो व्हिडिओ सगळ्या माध्यमांमधून व्हायरल झाले. पण लिबरल पुरोगाम्यांनी मात्र काश्मिरियत, इन्सानियत आणि मुस्लिमांच्या मदतकार्याची चर्चा घडवून स्वतःच्या तोंडावरचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घट्ट आवळून घेतला.
काश्मिरी मुसलमान कसे मानवतावादी आहेत, त्यांनी हिंदू पर्यटकांना कशी मदत केली, त्यांच्यामुळे अनेक जीव कसे वाचले, अशा वेगवेगळ्या स्टोरीज माध्यमांनी रंगवून दिल्या. 27 हिंदूंच्या हत्येपेक्षा त्या एका काश्मिरी मुसलमानाचे बलिदान कसे श्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी सगळ्या माध्यमांनी आपापसांतच चढाओढ केली.
पण त्यापेक्षाही लिबरल पुरोगाम्यांच्या एका युक्तिवादाने तर धर्मांध पाकिस्तान्यांना देखील लाजेने मान खाली घालायला लावली. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी भारतातल्या हिंदुत्वावर ठपका ठेवला, तर त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण पाकिस्तान शेवटी धर्मांध जिहादी शत्रू राष्ट्रच आहे. पण आपल्याकडच्या लिबरल पुरोगाम्यांनी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याच्या भाषणावर विश्वास ठेवून भारतातल्या हिंदू समाजावर आणि हिंदुत्ववादी सरकारवर ठपका ठेवला, ही बाब सगळ्यात धोकादायक ठरली. रॉबर्ट वाड्रा आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी दहशतवाद्यांच्या धर्माची चर्चाच नको, अशी भूमिका घेऊन पाकिस्तान धार्जिणा धर्मनिरपेक्ष प्रपोगांडा चालविला.
भारतात सरकारने हिंदुत्ववादी वातावरण तयार केल्याने मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यामुळे पहलगाम सारख्या हल्ल्यांना चिथावणी मिळाली, असा “जावईशोध” सोनिया गांधींचा जावई रॉबर्ट वाड्राने लावला. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू पुरुषांना मारले की नाही हे माहिती नाही, असे म्हणून शरद पवारांनी कानावर हात ठेवले. त्यांच्याच राष्ट्रवादीच्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुरावे मागितले. या सगळ्यांनी पाकिस्तानच्या नॅरेटिव्हला अप्रत्यक्ष पाठबळ दिले.
पण अमरनाथ यात्रेच्या वेळी जून महिन्यात बैसरन व्हॅली सगळ्यांसाठी खुली करायची हे ठरलेले असताना तिथल्या उमर अब्दुल्ला सरकारने स्थानिक पोलिसांना आणि भारतीय सैन्य दलाला न विचारता आणि पूर्वकल्पना न देता बैसरन व्हॅली परस्पर खुली केली. स्थानिक टूर ऑपरेटर्सनी पर्यटकांना सुरक्षा विषयक कुठलीही माहिती न देता बैसरन व्हॅलीत नेले हे दारुण सत्य मात्र लिबरल पुरोगाम्यांनी दडवून ठेवले. पण राष्ट्रीय तपास संस्था NIA ने नेमका त्याच मुद्द्यावरून संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App