संसदेत डावे पक्ष काँग्रेसच्या साथीत; केरळ विधानसभेत दांडकी एकमेकांच्या पाठीत!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेत मोदीविरोधात काँग्रेस आणि डावे पक्ष एकमेकांच्या साथीत पण केरळ विधानसभेत मात्र दांडकी एकमेकांच्या पाठीत, असे चित्र आहे. Left party in Parliament with Congress

संसदेत काँग्रेसने मोदी सरकार विरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीन खासदार आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एक खासदार उभा आहे. त्यांनी मोदी सरकार विरोधात मतदान करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी काँग्रेसला साथ देण्याची त्यांची तयारी आहे, पण याच्या उलट केरळ विधानसभेत मात्र डावे पक्ष आणि काँग्रेस एकमेकांचा घोट घ्यायला तयार आहेत.



केरळ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते डि. के. सतीशन त्यांनी राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईवरून डाव्या पक्षाच्या सरकारला जोरदार धारेवर धरले. केरळच्या डाव्या सरकारने राज्यात पाणीपट्टी, घरपट्टी वाढ केली. वीजदरात वाढ केली. ही दरवाढ कमी करण्याची काँग्रेसची मागणी आहे. पण सरकार ऐकत नाही त्यामुळे आता आम्ही विधानसभेत आणि विधानसभेत बाहेर जनआंदोलन उभे करू, असे डि. के. सतीशन यांनी सांगितले.

कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली सेवा विधेयक मंजूर करण्यापूर्वी राज्यसभेत बोलताना डावे पक्ष, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातली ही राजकीथ विसंगती बोलून दाखवली होती. तुम्ही सगळे पक्ष संसदेत मोदी सरकार विरोधात इलू इलू करता आणि पश्चिम बंगाल – केरळ मध्ये मात्र एकमेकांचे गळे धरता हे सगळे जनता पाहते आहे, अशा शब्दात अमित शाह यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे वाभाडे काढले होते.

आज त्याचाच प्रत्यय लोकसभा आणि केरळ विधानसभेत आला. लोकसभेत काँग्रेसने मोदी सरकार विरुद्ध मांडलेल्या अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावर डाव्या पक्षांनी काँग्रेसला साथ दिली, पण केरळ विधानसभेत मात्र डाव्या पक्षांच्या पाठीत आंदोलनाचे दांडके हाणले.

Left party in Parliament with Congress.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात