लोकसभा निवडणुकीच्या तणावात; सर्वपक्षीय नेते रंगले होळीच्या रंगात!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तणावात सर्वपक्षीय नेते रंगले होळीच्या रंगात असे चित्र आज संपूर्ण देशभर दिसले. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, त्यात सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाची रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक नेत्याच्या चेहऱ्यावर त्या जागावाटपाचा तणाव आहे, पण आज त्या तणावातून थोडा वेळ काढत किंबहुना थोडे मोकळीक घेत सगळे नेते होळीच्या रंगात रंगले. Leaders of all parties dressed in Holi colours

संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी लडाख आणि सियाचीन मध्ये जाऊन जवानांसमवेत होळी खेळली. बाकीचे सगळे नेते आपापल्या मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांसमवेत होळी खेळण्यात रंगले. अमित शाह यांनी गांधीनगर मध्ये जाऊन होळीचा आनंद लुटला. यंदा राम मंदिर पूर्ण झाल्याने या होळीचा रंग वेगळाच आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी आनंद व्यक्त केला.

महाराष्ट्रात महायुतीमध्ये अद्याप जागावाटप पूर्ण झालेले नाही. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जागा खेचण्यावरून बराच तणाव आहे. त्यातच विजय शिवतरे यांनी अजित पवारांविरुद्ध कठोर भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्यापुढेच आव्हान उभे केले आहे. या तणावातून बाजूला होत एकनाथ शिंदे यांनी रंग खेळत होळीचा आनंद घेतला.

हिमाचल प्रदेशात सुखविंदर सिंग सुक्खू यांचे काँग्रेस सरकार अडचणीत आहे. त्यांचे नऊ आमदार त्यांना सोडून बाजूला गेले आहेत त्यामुळे आता भविष्यात जे काय घडायचं ते घडू दे आज आपण होळीचा आनंद लुटू या, असे सांगत त्यांनी होळीचा आनंद लुटला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टोमणा मारत दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनी होळीचा आनंद लुटला. “कही खेल में, कही जेल में” अशा शब्दात त्यांनी केजरीवालांना टोला हाणला. भाजपची हिमाचल प्रदेश मधल्या मंडीतील उमेदवार अभिनेत्री कंगना राणावत ने देखील होळीचा आनंद लुटून जनतेला शुभेच्छा दिल्या.

Leaders of all parties dressed in Holi colours

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात