वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरातमधून दिल्लीला आलेल्या नेत्यांना महात्मा गांधी यांच्या विषयी फारशी माहिती नाही, अशा शब्दात काँग्रेसचे जी 23 चे बंडखोर नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. Leaders from Gujarat who came to Delhi do not know much about Gandhiji; Kapil Sibal targets Modi Shah
महात्मा गांधी जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलजीवन मिशन 2 ची सुरुवात केली आहे. त्याच वेळी महात्मा गांधींना स्वच्छता मिशनची जोडले आहे. मात्र कपिल सिब्बल यांनी त्यांच्यावर असत्यतेचा आरोप केला आहे.
कपिल सिब्बल म्हणाले, की गुजरातमधून दिल्लीला आलेल्या नेत्यांना महात्मा गांधी यांच्या विषयी फारशी माहिती नाही. गांधीजी म्हणायचे परमेश्वर एकच आहे. सत्य म्हणजेच परमेश्वर. पण मी मोदीजींना विचारू इच्छितो, त्यांच्याकडे सत्य कुठे आहे? त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत फक्त खोटेपणाचा आढळतो, असे टीकास्त्र कपिल सिब्बल यांनी सोडले आहे.
Leaders from Gujarat who've reached Delhi, maybe they know little about Gandhi ji. He has always said there is only god and the god is the truth. I want to ask Modi Ji, where is the truth? There is lies in words, even in work: Congress leader Kapil Sibal in Ahmedabad, Gujarat pic.twitter.com/AYGOcEorw0 — ANI (@ANI) October 2, 2021
Leaders from Gujarat who've reached Delhi, maybe they know little about Gandhi ji. He has always said there is only god and the god is the truth. I want to ask Modi Ji, where is the truth? There is lies in words, even in work: Congress leader Kapil Sibal in Ahmedabad, Gujarat pic.twitter.com/AYGOcEorw0
— ANI (@ANI) October 2, 2021
कपिल सिब्बल यांनी आत्तापर्यंत काँग्रेस नेत्यांना विशेषत: काँग्रेस हायकमांडला घेरले असल्याने ते सतत चर्चेत आहेत. पण आता त्यांनी मोदी आणि शहा यांच्यावर टीकास्त्र सोडून आपला निशाणा काँग्रेस नेत्यांपासून भाजप नेत्यांकडे वळवण्याचे स्पष्ट होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App