लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी विक्रम ब्रारला UAE मधून आणून NIAने केली अटक

Arrest new

सिद्धू मुसेवाला हत्याकांडात सहभाग, शिवाय टार्गेट किलिंग आणि खंडणीसह 11 गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एनआयएने लॉरेन्स बिश्नोईचे जवळचे सहकारी विक्रमजीत सिंग आणि विक्रम ब्रार यांना यूएईमधून भारतात आल्यानंतर लगेचच अटक केली आहे. NIA ने विक्रम ब्रारला UAE मधून भारतात आणले आहे. विक्रम ब्रार याच्यावर सिद्धू मुसेवाला हत्याकांडात सहभागी असल्याचा आरोप आहे. शिवाय टार्गेट किलिंग आणि खंडणीसह 11 गुन्ह्यांमध्ये तो वाँटेड होता. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरून त्याच्याविरुद्ध 11 लुकआउट नोटीस काढण्यात आल्या होत्या. Lawrence Bishnois close aide Vikram Brar was brought from UAE and arrested by NIA

लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांसारख्या गुंडांच्या मदतीने भारतात शस्त्रास्त्रांची तस्करी आणि खंडणीमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. 2020 पासून तो फरार होता. एनआयएने मंगळवारी (२५ जुलै) ब्रारला अटक केली. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, या हद्दपारीची सोय करण्यासाठी आणि विक्रम ब्रारला भारतात परत आणण्यासाठी एनआयएचे एक पथक यूएईला गेले होते.

एनआयएने एका प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे की विक्रम ब्रार हा यूएईमधील लॉरेन्स बिश्नोई दहशतवादी टोळीसाठी कम्युनिकेशन कंट्रोल रूम (सीसीआर) म्हणून काम करत होता, लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांना कॉल्सची सुविधा देत होता आणि त्यांच्या सूचनेनुसार, विविध लोकांना खंडणीचे कॉल केले जात होते.

Lawrence Bishnois close aide Vikram Brar was brought from UAE and arrested by NIA

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात