आपल्या नेत्याच्या महिमामंडनात उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या आमदाराने कडी केली आहे. चक्क समाजवादी अत्तर लॉँच केले आहे. अखिलेश यादव यांच्या हस्ते हे समाजवादी अत्तर लॉँच झाले असून त्याच्या बाटलीवर अखिलेश यांचाच फोटो आहे.Launch of Samajwadi Attar with photo of Akhilesh Yadav on the bottle
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : आपल्या नेत्याच्या महिमामंडनात उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या आमदाराने कडी केली आहे. चक्क समाजवादी अत्तर लॉँच केले आहे. अखिलेश यादव यांच्या हस्ते हे समाजवादी अत्तर लॉँच झाले असून त्याच्या बाटलीवर अखिलेश यांचाच फोटो आहे.
उत्तर प्रदेशात एकेकाळी नेताजी म्हणून मुलायमसिंह यादव यांचे महिमामंडन झाले. थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आपण अपमान करतो आहे याचीही पर्वा करण्यात आली नाही. आता समाजवादी पक्षाची धुरा अखिलेश यादव यांच्या हातात आहे. कन्नोज येथील आमदाराने अखिलेश यांची आरती ओवाळण्याची हद्द पार केली आहे. त्यांनी समाजवादी इत्र नावाने एक अत्तर लॉँच केले आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतची २२ नैसर्गिक अत्तरे एकत्र करून हे तयार केले असल्याचा दावा आहे. त्याच्या बाटलीवर एका बाजुला अखिलेश यादव यांचा फोटो आहे. समाजवादी पक्षाचे सायकल हे चिन्ह आणि लाल आणि हिरवा रंगही आहे. या आमदार महाशयांनी स्वत:चा मोबाईल नंबरही त्यावर टाकला आहे.
Happy Diwali : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, प्रकाशाचा हा सण प्रत्येक कुटुंबात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो !
आमदार पुष्पराज जैन यांनी म्हटले आहे की हे अत्तर तयार करायला ४ महिन्यांचा कालावधी लागला. दोन शासत्रज्ञांनी ते तयार केले आहे. या अत्तरात देशातील २२ राज्यांतील नैसर्गिक सुवासांचा वापर केला आहे. त्यामुळे देशातील द्वेषाची भावना संपेल अशी आशा आहे.
लखनऊ येथे झालेल्या कार्यक्रमात अखिलेश यादव म्हणाले, या अत्तराचा सुगंध २०२२ च्या निवडणुकांत दरवळेल. उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये समाजवादी पक्षाचेच सरकार येणार यामध्ये कोणतीही शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App