वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Lashkar-e-Taiba पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद अबोटाबादच्या लष्करी छावणीतील गुप्तचर संस्था आयएसआयच्या छावणीत जाऊन लपला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकच्या पंजाब प्रांतातील मुरीदके येथील लष्करच्या मदरशात लपून बसलेल्या हाफिजला ‘हल्ल्याची’ भीती वाटत होती. त्यामुळे २७ एप्रिल रोजी मुरीदकेच्या मदरशात होणारा कार्यक्रमही रद्द केला आहे.Lashkar-e-Taiba
इतर अनेक मदरशांमध्येही कार्यक्रम रद्द झाले. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर हाही बहावलपूरमधील आयएसआयच्या सेफ हाऊसमध्ये असल्याचे उघड झाले आहे. मसूद काही काळ खैबरमधील एका मदरशात लपला होता. गुरुवारी पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सुमारे ५ तासांच्या बैठकीनंतर जरी पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर म्हणून काही राजनैतिक निर्णय जाहीर केले असले तरी सर्वात महत्त्वाचा मुद्दा भारताकडून सर्जिकल स्ट्राइकची शक्यता कायम राहिली.
पहलगाम हल्ला; २४ तासांत तिसरी चकमक, जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सैनिकांनीही प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एक जवान शहीद झाला. लष्कराच्या नाइट कॉर्प्सच्या म्हणण्यानुसार दहशतवाद्यांच्या गोळीबारात स्पेशल फोर्सेसच्या ६ पॅराचे हवालदार झंटू अली शेख शहीद झाले. पोलिसांनी या भागातून चार जणांना ताब्यात घेतले आहे. गेल्या २४ तासांत जम्मूमध्ये सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये झालेली ही तिसरी चकमक आहे. बुधवारीच उरी नाला भागात लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App