बलात्कारानंतर दोन दलित बहिणींची हत्या; आरोपी सोहेल, जुनैद, हफीजुल, करीमुद्दीन, आरिफ आणि छोटूला पोलीसांच्या बेड्या!!

एक आरोपी घरी जाऊन झोपला, इतर 5 जण पळून जाण्याच्या होते प्रयत्नांत

वृत्तसंस्था

लखीमपूर : उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये 2 दलित बहिणींची बलात्कार करणाऱ्या करून निघृण हत्या करणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी गुन्ह्यानंतर काही तासातच बेड्या ठोकल्या आहेत. Lakhimpur dalit rape and murder case, police arrested 6 culprits

या दोन बहिणींवर या सोहेल जुनैद हाफिजुल रहमान करीम उद्दीन आरिफ या आरोपींनी पाशवी सामूहिक बलात्कार केला. नंतर त्यांना गळा दाबून ठार मारले. या हत्याकांडाला आत्महत्येचे रुप देण्यासाठी दोन्ही मुलींचे मृतदेह झाडाला टांगले. या प्रकरणी पोलिसांनी या सर्व 6 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यापैकी एक आरोपी जुनैद चकमकीत जखमी झाला आहे.

काल बुधवारी सायंकाळी 4 च्या सुमारास 3 आरोपींनी दोन्ही मुलींना घराबाहेरून दुचाकीवर घेऊन गेले. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सायंकाळी 5 च्या सुमारास सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या हत्येला आत्महत्येचा रंग देण्यासाठी 5 जणांनी मिळून त्यांचे मृतदेह झाडाला टांगले. हत्येनंतर हे तरुण पसार झाले. काही वेळातच या आरोपींची भेट छोटूशी झाली.

त्यांनी छोटूला संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि आपल्या गावाकडे गेले. रात्री 9 च्या सुमारास नागरिकांनी रास्ता रोको केला. त्यानंतर मुलींच्या वडिलांनी शेजारी राहणाऱ्या छोटूवर कटात सहभागी असल्याचा आरोप केला. तेव्हा छोटू आपल्या मित्रांची भेट घेऊन घरी शांतपणे झोपला होता. आपल्यावर कुणाचाही संशय येणार नाही, असा त्याचा विचार होता. पण पोलिसांनी त्याला घरातूनच उचलले.

पोलिसांनी छोटूला खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. छोटूनेच पोलिसांना सोहेल, जुनैद व हफीजुल र्रहमान यांचे मोबाइल क्रमांक दिले. पोलिसांनी ते सर्विलांसवर टाकले. हे आरोपी रात्री 10.30 च्या सुमारास आपापल्या घरी गेले. तिथे त्यांनी आरामात कपडे बदलून जेवण केले.

मध्यरात्री 12.00 वा. भेटण्याचे ठरले

तिघांनी मध्यरात्री 12.00 च्या सुमारास गावाबाहेर भेटण्याचे ठरवले. सोहेल आपल्या दुचाकीवरून सर्वप्रथम गावाबाहेर पडला. त्यानंतर हफीजुल र्रहमान आणि करीमुद्दीन आला. हे सर्वजण गाव सोडण्यासाठी आपल्या इतर दोन सहकाऱ्यांची वाट पाहत होते. तेव्हाच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रात्रीच आरिफच्या मुसक्या आवळल्या. यादरम्यान जुनैद संधी साधून पसार झाला. पोलिसांनी जुनैदलचा माग काढला असता त्याचे लोकेशन गावातीलच एक ऊसाच्या शेतात आढळले. पोलिसांनी तिथे सर्च ऑपरेशन सुरू केले. सकाळी 8 च्या सुमारास पोलिसांनी त्याला घेरले असता त्याने फायरिंगची धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला असता एक गोळी त्याच्या पायात शिरली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक गावठी पिस्तूल, 2 काडतूसे जप्त केली आहेत.

आरोपींची कबुली -रेपनंतर गळा घोटला

पोलिसांच्या माहितीनुसार, सोहेल आणि जुनैद दोघे मित्र आहेत. छोटूने त्यांची मुलींसोबत मैत्री करवून दिली होती. बुधवारी सायंकाळीही सोहेल, जुनैदने आपला तिसरा मित्र हफीजुल रहमानसोबत दुचाकीने येथे पोहोचले. त्यांनी मुलींना गोड बोलून घेऊन गेले. गावाबाहेरील शेतात त्यांनी त्यांच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलींनी लग्नाचा तगादा लावला. त्यावर दोघात भांडण झाले. त्यानंतर दोघांनी हफीजुल रहमानच्या मदतीने त्यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर सोहेल आणि इतर आरोपींनी करीमुद्दीन आणि आरिफ यांना बोलावले. त्यानंतर या सर्वांनी मुलींचे मृतदेह ओढणीच्या मदतीने झाडाला टांगले.

Lakhimpur dalit rape and murder case, police arrested 6 culprits

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात