Lakhimpur Case : गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा तुरुंगातून सुटणार, उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाकडून जामीन मंजूर

Lakhimpur Case Home Minister Ajay Mishra son Ashish Mishra to be released from jail, Lucknow bench grants bail

Lakhimpur Case : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा ऊर्फ ​​मोनूची लवकरच तुरुंगातून सुटका होणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने आज जामीन मंजूर केला. Lakhimpur Case Home Minister Ajay Mishra son Ashish Mishra to be released from jail, Lucknow bench grants bail


वृत्तसंस्था

लखनऊ : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा ऊर्फ ​​मोनूची लवकरच तुरुंगातून सुटका होणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने आज जामीन मंजूर केला.

न्यायमूर्ती राजीव सिंह यांच्या एकल खंडपीठाने हा आदेश दिला आहे. 18 जानेवारी रोजी लखनऊ खंडपीठाने सुनावणीनंतर निर्णय राखून ठेवला होता. आशिष मिश्रा यांच्यावर लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया गावात गेल्या वर्षी ३ ऑक्टोबरला आंदोलक शेतकऱ्यांना जीपखाली चिरडल्याचा आरोप आहे.

संपूर्ण घटना सुनियोजित कट – SIT

या प्रकरणाचा तपास करणार्‍या एसआयटीला त्यांच्या तपासात निष्पन्न झाले की, शेतकर्‍यांना वाहनाने चिरडण्याची संपूर्ण घटना सुनियोजित कट होती. यानंतर एसआयटीने 5000 पानांचे आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये आशिष मिश्रा हत्येचा आरोप असल्याचे आढळले. एसआयटीने या घटनेत एकूण 16 जणांना आरोपी बनवले होते. एसआयटीने आरोपींवर IPC कलम 307, 326, 302, 34,120B, 147, 148,149, 3/25/30 लावले आहेत.

आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चढवली

गेल्या वर्षी ३ ऑक्टोबरला लखीमपूर खेरीतील टिकुनिया येथे चार शेतकरी कृषी कायद्यांचा निषेध करत एका कार्यक्रमातून परतत असताना एका एसयूव्ही कारने त्यांना चिरडले होते. या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात काही लोकांचा मृत्यूही झाला होता. ही एसयूव्ही अजय मिश्रा टेनी यांची असून त्यांचा मुलगा आशिष मिश्रा त्यात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. अनेक दिवसांच्या हिंसाचारानंतर अनेक तासांच्या चौकशीनंतर 9 ऑक्टोबर रोजी आशिष मिश्राला अटक करण्यात आली होती.

Lakhimpur Case Home Minister Ajay Mishra son Ashish Mishra to be released from jail, Lucknow bench grants bail

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub