वृत्तसंस्थ
लेह : Sonam Wangchuk लडाखचे डीजीपी एसडी सिंह जामवाल यांनी शनिवारी सांगितले की, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या एका सदस्याशी संपर्क होता. पीआयओ सदस्याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. तो पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पाठवत होता. आमच्याकडे याचे रेकॉर्ड आहेत.Sonam Wangchuk
शिवाय, वांगचुक यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या एका कार्यक्रमालाही हजेरी लावली होती. त्यांनी बांगलादेशलाही भेट दिली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी सध्या सुरू आहे.Sonam Wangchuk
शुक्रवारी दुपारी पोलिसांनी वांगचुक यांना त्यांच्या उल्याकटोपो या गावातून अटक केली. त्यांना राजस्थानमधील जोधपूर मध्यवर्ती कारागृहात विमानाने नेण्यात आले. वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो जामिनाविना दीर्घकाळ ताब्यात ठेवण्याची परवानगी देतो.Sonam Wangchuk
२४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी सरकारने वांगचुक यांना जबाबदार धरले, ज्यामध्ये चार तरुणांचा मृत्यू झाला आणि ४० पोलिस अधिकाऱ्यांसह ८० लोक जखमी झाले. आतापर्यंत साठ जणांना अटक करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेपूर्वी पोलिसांनी त्यांना अटक केली.
शुक्रवारी दुपारी २:३० वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी अटक केली. जेव्हा ते लेहमध्ये पोहोचू शकले नाहीत तेव्हा आयोजकांना संशय आला. त्यांच्या अटकेची बातमी नंतर कळली. तरीही, पत्रकार परिषद झाली. आयोजकांनी कबूल केले की, हा हिंसाचार ‘नियंत्रणाबाहेर’ गेलेल्या तरुणांमुळे झाला होता, परंतु त्यात कोणत्याही परदेशी शक्तीचा सहभाग नाही.
लेह एपेक्स बॉडी (LAB) चे सह-अध्यक्ष चेरिंग दोरजे यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, पोलिसांनी आणि सीआरपीएफने पाण्याच्या तोफांचा वापर केला नाही किंवा चेतावणी देणारे गोळीबार केले नाहीत, उलट त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
वांगचुक यांना त्यांच्या अटकेची अपेक्षा होती
सोनम वांगचुक यांना सरकारच्या संभाव्य अटकेची आधीच कल्पना होती. फक्त एक दिवस आधी त्यांनी म्हटले होते की, “या मुद्द्यावर मला कधीही अटक करावी लागली, तर मला आनंद होईल.” पण आता, परिस्थिती शांत होण्याऐवजी, त्यांच्या अटकेमुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते.
याचा परिणाम लडाख प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेल्या चर्चेवर होऊ शकतो असे मानले जाते. गेल्या पाच वर्षांपासून लडाखच्या हक्कांच्या लढाईत वांगचुक हे एक प्रमुख व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या अटकेमुळे जनभावना दुखावल्या गेल्या आहेत. स्थानिकांचा असा विश्वास आहे की, वांगचुक हिंसाचाराला चिथावणी देणारे नाहीत, तर ते शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करत होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App