वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कुवेतचे नवे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-सबाह यांनी देशाची संसद बरखास्त केली आहे. आमिरांनी शुक्रवारी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या भाषणात ही घोषणा केली. देशाच्या लोकशाहीचा मी गैरवापर होऊ देणार नाही, त्यांनी चार वर्षांपासून देशातील सरकारी खात्यांवर ताबा मिळवत अनेक कायदे मोडले आहेत, असे ते म्हणाले.Kuwait’s emir dissolves country’s parliament; All departments taken over, decision taken due to increased corruption
सोमवारी, 13 मे रोजी संसदेची प्रथमच बैठक होणार होती, परंतु अनेक राजकारण्यांनी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. आमीर म्हणाले की, सरकार स्थापन करण्यात आलेले अपयश हे काही आमदारांच्या आदेश आणि अटींचा परिणाम आहे.
कुवेतच्या सरकारी टीव्हीनुसार, संसद बरखास्त केल्यानंतर नॅशनल असेंब्लीचे सर्व अधिकार अमीर आणि देशाच्या मंत्रिमंडळाकडे आले आहेत. याआधी, देशाची संसद फेब्रुवारीमध्ये शेवटच्या वेळी विसर्जित करण्यात आली होती, त्यानंतर एप्रिलमध्ये देशात निवडणुका झाल्या होत्या.
‘भ्रष्टाचार ही कुवेतची सर्वात मोठी समस्या’
कुवेतचे अमिर म्हणाले, “कुवेत सध्या कठीण काळातून जात आहे. यामुळे आम्हाला देश वाचवण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. यामुळे वातावरण बिघडले आहे.
हा भ्रष्टाचार देशाच्या सुरक्षा आणि आर्थिक संस्थांपर्यंत पोहोचल्याचे अमीर यांनी म्हटले आहे. देशाच्या न्याय व्यवस्थेतील भ्रष्टाचारावरही ते बोलले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App