विशेष प्रतिनिधी
मुंबई : विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दारीची स्टँड अप कॉमेडी करणारा कुणाला कामरा हातात लाल संविधान घेऊन महाराष्ट्र सरकारला आव्हान देत होता, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याचा बडगा उगारताच हा लाल संविधानी कुणाल कामरा अटकेच्या भीतीने रफूचक्कर झाला.
कुणाल कामराने काल खारच्या हॅबिटॅट स्टुडिओमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार म्हणत विडंबन काव्य सादर केले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील विडंबन काव्य सादर केले. त्यामुळे भडकलेल्या शिवसैनिकांनी हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली. त्याबद्दल ११ शिवसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. शिवसैनिकांनी कुणाल कामराविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या. पण कुणाल कामराने आपण संविधानानुसार बोलतो आणि काम करतो, असा असा दावा करत लाल संविधान हातात घेतलेला फोटो ट्विट केला. त्या फोटोतून त्याने पोलिसांना आपल्या विरुद्ध कारवाई करण्याचे आव्हान दिले.
त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात कुणाल कामराच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्याबरोबर कुणाला कामरा रफूचक्कर झाला. त्याने फोन स्विच ऑफ केला. तो कुठे गेलाय हे पोलीस शोधत आहेत. त्याचा फोन ट्रेस केला जात आहे. त्याला लवकरच अटक करू, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
– सुपारी घेऊन कुणाल कामराची कॉमेडी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कुणाल कामराचा समाचार घेतला. कुणाल कामरा लाल संविधान हातात घेऊन स्टॅंड अप कॉमेडी करत होता. पण त्याने संविधानाची मर्यादा ओलांडली होती. महाराष्ट्राच्या जनतेने गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे दाखवून दिले. कुणाला कामरा हा महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई होणार हे निश्चित. स्टँड अप कॉमेडी आम्हाला पण आवडते आम्ही देखील त्या कॉमेडीला दाद देतो पण संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार केला तर त्याला आम्ही सोडणार नाही. रणवीर अलाहाबादियाला सोडले नाही, तसेच अर्बन नक्षल असलेल्या कुणाल कामरालाही सोडणार नाही. कारण त्यांनी कुणाची तरी सुपारी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम केले. असली बदनामी महाराष्ट्र सहन करणार नाही एमी त्याच्या बाजूने छाती बडवणाऱ्यांना सांगतो, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App