चीनमध्ये ११ प्रांतात कोविडचा प्रसार पुन्हा वाढला, नागरिकांना घरातच थांबण्याचे निर्देश

विशेष प्रतिनिधी

बीजिंग – चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने चीनमधील ११ प्रांतात कोविडचा प्रसार झाल्याचे म्हटले आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर राहू शकते, असा इशारा दिला आहे. त्यामुळे एजिन कौंटीत लॉकडाउन लागू करण्यात आले आहे.Kovid has re-emerged in 11 provinces in China, prompting citizens to stay indoors

चीनच्या अनेक भागात कोरोना संसर्गाचा डेल्टा व्हेरियंट वेगाने प्रसार होत आहे. चीनच्या नेऋत्य भागात मंगोलियाच्या एजिन कौंटीतील नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बीजिंगसह इनर मंगोलिया, ग्वांत्झू, निग्झिंया, गुईझोऊमध्ये कोरोना संसर्ग वाढला आहे.



या राज्यात बहुतांश ठिकाणी प्रवासांवर बंदी घातली आहे. रेल्वे वाहतुकीवरही निर्बंध घातले आहेत. प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. चीनमध्ये सध्या ५७५ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी २० रुग्ण गंभीर आहेत.

एजिन कौंटीची लोकसंख्या ३५,७०० आहे. त्यांना कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या एजिना कौंटीचा बहुतांश भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून तेथे गेल्या आठवड्यात दीडशेपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून आले होते.

चीनमध्ये काल चोवीस तासात ३० हून अधिक रुग्ण आढळून आले असून त्यापैकी बहुतांश मंगोलियाचे रहिवासी आहेत. दुसरीकडे राजधानी बीजिंगमध्ये कोरोना बाधितांची संख्या १२ झाली असून तेथे संख्या वाढच चालली आहे.

Kovid has re-emerged in 11 provinces in China, prompting citizens to stay indoors

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात