फुटबॉलर मेस्सीचा भारत दौरा; काँग्रेसचा कम्युनिस्टांना आणि ममतांना झटका!!

नाशिक : जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा दौरा झाला, त्याच दिवशी काँग्रेसने कम्युनिस्टांना आणि ममता बॅनर्जींना मोठा झटका दिला.

वास्तविक केरळमध्ये काँग्रेसने कम्युनिस्टांना झटका दिला. त्याचा संबंध मेस्सीच्या दौऱ्याशी जोडता येईलच असे नाही, पण तो भारत दौऱ्यावर आल्याच्या दिवशी फुटबॉल प्रेमी केरळमध्ये काँग्रेसने कम्युनिस्टांना झटका दिला ही वस्तुस्थिती पण नाकारण्यात मतलब नाही.

– ममतांचा डाव फसला

पण त्या पलीकडे जाऊन लिओनेल मेस्सीच्या दौऱ्याच्या निमित्ताने काँग्रेसने ममता बॅनर्जींना मात्र चांगलाच झटका दिला. कारण मेस्सीचा दौरा कोलकत्ता मध्ये आधी आयोजित करून त्याच्याबरोबर शायनिंग मारण्याचा ममतांचा डाव उधळला गेला. सॉल्ट लेक स्टेडियम मधल्या गदारोळामुळे मेस्सीचा कोलकत्ता दौरा अक्षरशः उधळला गेला. हजारो फुटबॉल प्रेमींची निराशा झाली. त्यांनी अख्खे स्टेडियम मोडून सगळा राग बाहेर काढला. ममता बॅनर्जी तिथे येऊन पोहोचायच्या आत लिओनेल मेस्सी तिथून निघून गेला होता. त्यामुळे ममतांना मेस्सी बरोबर मोठा इव्हेंट करून त्याचा राजकीय फायदा करून घेण्याची संधीच मिळाली नाही. उलट स्टेडियम मधल्या गदारोळामुळे मेस्सीला लवकर निघून जावे लागले आणि त्याच्या इव्हेंट्स सगळा फज्जा उडाला म्हणून ममता बॅनर्जी यांना मेस्सीची आणि बंगाली फुटबॉल प्रेमींची माफी मागावी लागली. मेस्सीला कोलकत्यात आणून त्याच्याबरोबर शायनिंग मारायचा ममतांचा सगळा प्रयत्न वाया गेला.

– मेस्सी बरोबर रेवंत रेड्डींची शायनिंग

त्या उलट तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी लिओनेल मेस्सी बरोबर हैदराबाद मधल्या इव्हेंट मध्ये जोरदार शायनिंग मारून घेतली. शिवाय त्यांनी एकट्यांनीच शायनिंग मारली नाही, तर त्यांनी त्यात राहुल गांधींनाही सामील करून घेतले. रेवंत रेड्डी यांनी मेस्सीला हैदराबादच्या फलकनुमा पॅलेस मध्ये उतविले. तिथे त्यांनी त्याची चांगली सरबराई केली. त्याला हैदराबाद मधल्या राजीव गांधी स्टेडियम मध्ये नेऊन मोठा इव्हेंट केला. त्यावेळी रेवंत रेड्डी स्वतः फुटबॉलरच्या जर्सी आणि निकर मध्ये वापरले. मेस्सी तेलंगणातल्या वेगवेगळ्या क्लब बरोबर 7 अ साइड मॅच खेळला. या मॅच मध्ये रेवंत रेड्डी सुद्धा सामील झाले.

– ममतांचा पापड मोडला, पण

मेस्सीला कोलकात्यामध्ये नेऊन ममता बॅनर्जींना जे जे करायचे होते, ते ते सगळे रेवंत रेड्डी यांनी हैदराबाद मध्ये करून घेतले. त्यांनी मेस्सी आणि राहुल गांधी यांच्याबरोबर फुल टू शायनिंग मारून घेतली. त्यामुळे बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचा पापड मोडला, पण काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा तेलंगणात आणि काँग्रेसमध्ये चांगलाच वट वाढला.

https://www.youtube.com/post/UgkxNpZYaCD2Nwam_-9U6mQJdatO4wWYRimo

Kolkata, West Bengal: Angry fans vandalise the Salt Lake Stadium in Kolkata

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात