विशेष प्रतिनिधी
काेलकाता : काेलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडितेच्या पालकांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जाब विचारला आहे. एका बाजुला मुख्यमंत्री माझ्या मुलीला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे म्हणत आहेत. मग जनक्षाेभ दाबण्यासाठी प्रयत्न का केला जात आहे? ही दुटप्पी भूमिका कशासाठी असा दावा पीडितेच्य वडीलांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना पीडितेचे वडील म्हणाले, “मुख्यमंत्री माझ्या मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत आणि न्यायाबद्दल बोलत आहेत. आणि त्याचवेळी मात्र त्या जनक्षोभ दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. ही दुटप्पी भूमिका कशासाठी? त्यांना लोकांची भीती वाटते का? आमच्याकडे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे हवी आहेत. जे उघड आणि पुढे येऊन आंदोलन करत आहेत, त्यांचा आवाज मुख्यमंत्र्यांनी दाबला आहे. त्या स्वत: निषेधार्थ रस्त्यावर उतरत असताना, इतरांनी निषेध करू नये यासाठी व्यवस्था करत आहेत.
“मुख्यमंत्री न्याय देण्याबद्दल बोलत आहेत, मात्र न्याय मागणाऱ्या सर्वसामान्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा त्यांना (ममता बॅनर्जी) स्वतःला न्याय हवा असतो तेव्हा त्या रस्त्यावर उतरतात आणि आता त्या जनतेला मात्र थांबवत आहेत.पीडितेच्या पालकांनी सांगितले की, ९ ऑगस्टला सकाळी फोनवर सांगण्यात आले की, त्यांच्या मुलीने ती नोकरी करत असलेल्या रुग्णालयात आत्महत्या केली आहे. प्रथम आम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला की, तुमची मुलगी आजारी आहे, नंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. त्यानंतर मी फोन करून काय झाले असे विचारले असता त्यांनी मला रुग्णालयात येण्यास सांगितले. जेव्हा आम्ही पुन्हा कॉल केला तेव्हा कॉलरने स्वतःची ओळख असिस्टंट सुपर अशी करून देत सांगितले की, तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत आहोत.
Supreme Court : केंद्राने सुप्रीम कोर्टाला म्हटले तीन तलाक घातक, मुस्लिमांनी हे थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत
आम्ही ज्या लोकांशी बोललो ते सर्व, अगदी डॉक्टर सुद्धा हे मान्य करतात की हे कृत्य एका व्यक्तीचं नाही. या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात दुःखद भाग म्हणजे, मुलीच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेले लोक ते कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरले आहेत. पालक या नात्याने, जेव्हा आमचे मूल रस्त्यावर असते तेव्हा आम्हाला काळजी वाटते, पण जेव्हा ती तिच्या कामाच्या ठिकाणी पोहोचते तेव्हा ही काळजी नसायची. पूर्वी आम्ही तिला शाळेत सोडायचो. ती गेटच्या आत गेली की, आम्हाला हायस वाटायचं. आता ती मोठी झाली होती. रस्त्यांची अडचण होतीच, म्हणून आम्ही तिला एक कार देखील घेऊन दिली.
पीडितेच्या वडिलांनी दावा केला की, इतर मृतदेह रांगेत असतानाही त्यांच्या मुलीच्या मृतदेहावर आधी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत तीन मृतदेह होते पण त्यांच्या आधी आमच्या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमची एकुलती एक मुलगी गमावल्यानंतर आम्ही अतिशय अस्वस्थ मनस्थितीत होतो. त्यामुळे आम्ही त्यावेळी विचार करू शकलो नाही किंवा त्या पद्धतीने वागू शकलो नाही. त्यांनी फक्त शक्य तितक्या लवकर केस बंद करण्याचा प्रयत्न केला. शक्य तितक्या लवकर शवविच्छेदन करून मृतदेह बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही… (चेस्ट मेडिसिन) विभाग किंवा महाविद्यालयाने आम्हाला सहकार्य केले नाही.
माझ्या मुलीच्या हत्येसाठी संपूर्ण विभाग जबाबदार आहे. आम्हाला संशय आहे की, विभागातील काही लोक या गुन्ह्यात सामील आहेत,” असं पिडीतेचे वडील म्हणाले. ‘२०१२ च्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिता निर्भयाच्या आईने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाल्यानंतर परिस्थिती हाताळण्यात त्या ‘अयशस्वी’ ठरल्या.लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न” केल्याबद्दल ममता बॅनर्जींवर टीका केली. “दोषींवर कारवाई करण्याऐवजी ममता बॅनर्जी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या स्वतः एक महिला आहेत. त्यांनी राज्याच्या प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत दोषींवर कठोर कारवाई करायला हवी होती. त्यांनी राजीनामा द्यावा कारण त्या परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्या आहेत. जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार बलात्कार करणाऱ्यांना न्यायालयाकडून त्वरीत शिक्षा व्हावी यासाठी गंभीर पावलं उचलत नाहीत, तोपर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये असे क्रूर प्रकार रोज होतच राहतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App