Kolkata Murder Case : घटनेच्या रात्री कुठे होता अटकेत असलेला संजय राय?

Kolkata Murder Case

तीन महिन्यांपूर्वी केलं होतं कृत्य ; सीबीआयने खुलासा केला


विशेष प्रतिनिधी

कोलकाता: आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील ज्युनियर महिला डॉक्टरांविरुद्ध क्रूरतेच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नागरी स्वयंसेवक संजय राय ( Sanjay Rai ) यांच्यावर या रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांचा विनयभंग केल्याचा आरोप याआधीच करण्यात आला आहे.

सीबीआयच्या तपासात ही बाब समोर आली आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी संजयने दारूच्या नशेत रुग्णालयातील महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचे उघड झाले आहे.



याबाबत काही डॉक्टरांनी रुग्णालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ.संदीप घोष यांच्याकडे तक्रार केली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती, मात्र तरीही संजयवर कारवाई झाली नाही. या संदर्भात सीबीआय डॉ. घोष यांची चौकशी करत आहे.

तपासात असेही समोर आले आहे की, नागरी स्वयंसेवक असूनही संजयने स्वत:ला खूप प्रभावशाली असल्याचे सांगितले. त्याचा पाठिशी कोणाचा हात होता, याचा शोध घेण्याचा केंद्रीय तपास यंत्रणा प्रयत्न करत आहे. घटनेच्या संध्याकाळीही संजयने चेतला परिसरात एका महिलेचा विनयभंग केला होता. रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करून संजय अनेकदा हॉस्पिटलच्या आवारात फिरत असे, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Kolkata Murder Case Where was the arrested Sanjay Rai on the night of the incident

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात