कोलकत्ता महापालिका निवडणुकीत मतदानानंतरही भाजप – तृणमूळमध्ये जबरदस्त घमासान; अख्खी निवडणूकच रद्द करण्याची भाजपची मागणी!!

वृत्तसंस्था

कोलकाता : कोलकाता महापालिकेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या मध्ये तर घमासान झालेच, पण आज झालेल्या मतदानानंतर देखील हे घमासान थांबलेले नाही. उलट हे घमासान आणखी वाढले असून भाजपने कोलकत्ता महापालिकेची अख्खी निवडणूकच रद्द करण्याची मागणी राज्यपाल जगदीश धनगर आणि निवडणूक आयोग यांच्याकडे केली आहे. Kolkata municipal election should be announced null and void, says Suvedu Adhikari

कोलकता महापालिका निवडणूक पश्चिम बंगाल पोलिसांच्या निगराणीखाली व्हावी की केंद्रीय पोलिस दलाच्या निगराणीखाली व्हावी, या वरून मतदानाच्या अखेरच्या दिवसापर्यंत जोरदार वाद झाला. हायकोर्टाने कोलकत्ता पोलिसांच्या बाजूने निकाल दिला पण भाजप याविरोधात सुप्रीम कोर्टात गेला. त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. तरी देखील आज मतदान पार पडले.



कोलकत्ता पोलिसांनी प्रशंसनीय काम केल्याचे सर्टिफिकेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुपारी चार वाजता दिले. परंतु, कोलकत्ता पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना मुक्तहस्ते बोगस मतदान करू दिले, असा आरोप भाजपचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला. भाजपच्या तब्बल 50 टक्के निवडणूक एजंटला बुथपर्यंत पोहोचूच दिले नाही, असा आरोपही त्यांनी पोलिसांवर केला.

त्यामुळे सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे वरिष्ठ आमदारांचे शिष्टमंडळ राज्यपाल जगदीश धनगर यांना भेटले. त्यांच्याकडे काही व्हिडीओ फुटेज सादर केले. त्याच बरोबर याच पद्धतीचे व्हिडिओ कुठेच आम्ही सुप्रीम कोर्टात सादर करू. निवडणूक आयोगाकडे देऊ. ही संपूर्ण निवडणूक तृणमूल काँग्रेसने कब्जात घेतली होती. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी वाटेल तेवढा वेळ मतदान केले. त्यामुळे संपूर्ण निवडणूक रद्द करावी, हीच आमची मुख्य मागणी आहे असे ममता सुवेंदू अधिकारी म्हणाले. ममता बॅनर्जी यांनी मात्र मतदान अतिशय शांततेत पार पडले आहे. कोलकत्ता पोलिसांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे, असे वक्तव्य केले आहे.

भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची ही परस्परविरोधी वक्तव्य महापालिकेचे मतदान पार पडल्यानंतर देखील तितकीच तीव्र तसेच परस्पर विरोधी आहेत. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात नेमका या प्रकरणाचा काय निकाल लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेत.

Kolkata municipal election should be announced null and void, says Suvedu Adhikari

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात