विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Kolhapuri Chappals प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फॅशन कंपनी प्राडा ने कबूल केलं की त्यांच्या फॅशन शोमध्ये वापरलेल्या चप्पला म्हणजे खऱ्या कोल्हापुरी चप्पला होत्या. त्यांनी कोल्हापुरातील चप्पल व्यावसायिकांना आश्वासन दिलं की, त्यांना आता जागतिक बाजारपेठेत संधी मिळेल.Kolhapuri Chappals
प्राडाकडून आलेल्या सहा सदस्यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापुरातील विविध चप्पल कारखाने आणि क्लस्टरना भेट दिली. त्यांनी कंदलगावमधील चप्पल कारखाना आणि कागल येथील महिलांच्या चप्पल क्लस्टर केंद्राला भेट दिली. तेथे चप्पल तयार करण्याची प्रक्रिया आणि कामकाज पाहिले.Kolhapuri Chappals
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले की, पुढील महिन्यात प्राडाचे बिझनेस हेड मुंबईला येणार आहेत. तेव्हा त्यांची कोल्हापुरी चप्पल व्यावसायिकांशी भेट घडवून आणली जाईल.
शिष्टमंडळात प्राडाच्या उत्पादन विभागातील पाओलो टिव्हरॉन, डॅनिएल कोंटू, आंद्रिया पोलास्ट्रेली हे अधिकारी होते.
कोल्हापुरातील चप्पल कारखान्यांना भेट
प्राडाच्या शिष्टमंडळाने जवाहरनगर, सुभाषनगर भागातील अरुण सातपुते, बाळू गवळी, सुनील कोळेकर, दीपक खांडेकर, शिवाजी माने आणि सुनील लोकरे यांच्या चप्पल कारखान्यांना भेट दिली. त्यांनी उत्पादन, बांधणी आणि विक्री याबद्दल माहिती घेतली.
फॅशन शोमध्ये दाखवलेल्या चप्पला कोल्हापुरीच होत्या, हे मान्य करत त्यांनी कोल्हापुरी चप्पल व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी देण्याचे आश्वासन दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App