विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या आघाडीची चर्चा रंगलेली असताना प्रत्यक्ष लढाई कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत होणार आहे. तेथे महाविकास आघाडीतला काँग्रेसचा उमेदवार मात्र आघाडीतच एकटा पडल्याचे चित्र आहे.Kolhapur Byelection: Rajesh Kshirsagar Notreachable; Shiv Sainik angry; Congress alone in the battle of Kolhapur
जयश्री जाधव यांची घोषणा बाकी
काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांची औपचारिक उमेदवारीची घोषणा बाकी असली तरी त्याच निवडणूक लढवणार हे स्पष्ट आहे. पण त्याच वेळी महा विकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेना मात्र स्थानिक पातळीवर नाराज असल्याचे दिसून येत आहे.
शिवसैनिक नाराज
कोल्हापूर उत्तर मतदार संघाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसैनिक पक्षनेतृत्वाच्या निर्णयावर नाराज आहेत. कारण त्यांना न विचारता शिवसेनेने कोल्हापूर उत्तर मधून माघार घ्यायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजेश क्षीरसागर हे नॉट रिचेबल झाले आहेत.
राजेश क्षीरसागर यांनी आक्रमकपणे आधीच कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतलेच दोन घटक पक्ष शिवसेना आणि काँग्रेस यांची तोंडे परस्पर विरुद्ध दिशेला झाली आहेत. त्यामुळे जयश्री जाधव यांना आमदार यशवंत जाधव यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट कशी तारणार?, असा सवाल निर्माण झाला आहे.
घटक पक्षांची तोंडे तीन दिशांना
राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका देखील पुरेशी स्पष्ट नसून ती संदिग्धता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत राज्याच्या पातळीवर जरी नेते काही बाबतीत एकाच तोंडाने बोलत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र या तिन्ही पक्षांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे तीनही पक्षाच्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपुढे मात्र भाजपचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
सत्यजित कदम तगडा उमेदवार
भाजपने सत्यजित कदम यांच्या रुपाने तगडा उमेदवार उभा केल्यानंतर कोल्हापूर उत्तर मध्ये “पंढरपूर पॅटर्न” राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक मतदाराला जाऊन भेटणे हा भाजपचा कार्यक्रम आहे. पंढरपूर मध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र राहिले होते परंतु तरी देखील भगीरथ भालके यांचा तिथे पराभव झाला. तोच “पंढरपूर पॅटर्न” कोल्हापूर उत्तर मध्ये राबविण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी केला आहे आणि या निर्धाराला “नॉट रिचेबल” राजेश क्षीरसागर यांची देखील साथ मिळाल्याचे बोलले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App