काश्मीरबाबत पाकिस्तानने कधीही आपल्या कुरापती थांबवलेल्या नाहीत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (यूएनजीए) पुन्हा एकदा काश्मीरचा सूर आळवला आहे. पण दरवेळीप्रमाणे या वेळीही त्यांना भारताकडून कठोर प्रत्युत्तर मिळाले आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या पहिल्या सचिव स्नेहा दुबे यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानचा दहशतवाद्यांना उघडपणे पाठिंबा देण्याचा इतिहास आहे. Know About IFS Sneha Dubey Who Gives Strong Reply To Pakistan Over Kashmir Issue In UN
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काश्मीरबाबत पाकिस्तानने कधीही आपल्या कुरापती थांबवलेल्या नाहीत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (यूएनजीए) पुन्हा एकदा काश्मीरचा सूर आळवला आहे. पण दरवेळीप्रमाणे या वेळीही त्यांना भारताकडून कठोर प्रत्युत्तर मिळाले आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या पहिल्या सचिव स्नेहा दुबे यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानचा दहशतवाद्यांना उघडपणे पाठिंबा देण्याचा इतिहास आहे.
स्नेहा दुबे यांनी राइट टू रिप्लाय वापरून उत्तर दिले. त्या म्हणाल्या, “पाकिस्तानच्या नेत्याने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर करून माझ्या देशाविरुद्ध खोटा आणि दुर्भावनापूर्ण प्रचार करण्याची ही पहिली वेळ नाही. पाकिस्तानी नेते जगाचे लक्ष आपल्या देशाच्या दु:खद अवस्थेकडून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, जिथे दहशतवादी मुक्तपणे फिरतात. तर सामान्य नागरिक, विशेषत: अल्पसंख्याक समाजातील लोकांवर अत्याचार होतात.”
इम्रान खान यांना संपूर्ण जगासमोर आरसा दाखवणाऱ्या स्नेहा दुबे यांनी पहिल्याच प्रयत्नातच यूपीएससीमध्ये यश मिळवले. 2012 च्या बॅचच्या त्या महिला अधिकारी आहेत. आयएफएस झाल्यानंतर त्यांची परराष्ट्र मंत्रालयात नियुक्ती झाली. 2014 मध्ये त्यांना माद्रिद येथील भारतीय दूतावासात पाठवण्यात आले.
सध्या त्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या पहिल्या सचिव आहेत. आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये स्वारस्य असल्यामुळे स्नेहा दुबे यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. स्नेहा यांनी जेएनयूमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी येथून एमए आणि एमफिल केले आहे. स्नेहा यांचे सुरुवातीचे शिक्षण गोव्यात झाले. यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. स्नेहा दुबे एकदा म्हणाल्या होत्या की, त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य नागरी सेवेत नाही.
अशाप्रकारे गोवा आणि दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेऊन स्नेहा दुबे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. आता शत्रू देशाचा बुरखा त्यांनी जगासमोर फाडला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या पहिल्या सचिव स्नेहा दुबे म्हणाल्या, “पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा इतिहास आहे, त्यांना सक्रियपणे पाठिंबा आहे याची अनेक देशांना जाणीव आहे. हे त्यांचे धोरण आहे. दहशतवाद्यांना पाठिंबा देणे, शस्त्रास्त्रे पुरवणे आणि आर्थिक मदत करणे यासाठी जागतिक स्तरावर त्याची ओळख झाली आहे.
पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना स्नेहा दुबे म्हणाल्या, “जम्मू-काश्मीर आणि लडाखचा संपूर्ण भाग भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. त्यात पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या क्षेत्रांचाही समावेश आहे. आम्ही पाकिस्तानला त्यांच्या अवैध ताब्यातील सर्व भूभाग त्वरित सोडण्याचे आवाहन करतो, असेही त्या म्हणाल्या.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App