वृत्तसंस्था
टोरँटो : कॅनडात खलिस्तानी संघटनेचे निंदनीय कृत्य पुन्हा एकदा समोर आले आहे. कॅनडात दिवाळी निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात खलिस्तानी समर्थकांनी भारतीय समुदायावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. Khalistani supporters beat up Indians at Diwali event in Canada; The role of the police as a watcher; Protest by India
दिवाळीनिमित्त कॅनडातील मिसिगॉग येथे भारतीयांनी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये खलिस्तानी समर्थकांनी घुसखोरी केली. यावेळी काही खलिस्तानी समर्थक भारतीय समुदायाच्या लोकांना भिडले. त्यानंतर खलिस्तान्यांनी भारतीयांना मारहाण केली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुख्य म्हणजे ही घटना घडत असताना उपस्थित असलेल्या पोलिसांनी केवळ बघ्यांची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
खलिस्तान्यांच्या भारतविरोधी कारवाया
कॅनडामध्ये गेल्या काही दिवसांपासून खलिस्तान्यांनी विघातक गोष्टींना सुरुवात केली आहे. कॅनडातील मंदिरांवर हल्ले करणे आणि मंदिरांच्या भिंतींवर खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा लिहिणे अशी कृत्ये खलिस्तानी समर्थकांनी केली आहेत. कॅनडात खलिस्तानी समर्थकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्याकडून भारतविरोधी कारवाया करण्यात येत आहेत.
भारताकडून निषेध
खलिस्तान्यांकडून होत असलेल्या कारवायांचा निषेध भारत सरकारने कॅनडा सरकारडे नोंदवला आहे. मात्र तरीही अजून खलिस्तानी समर्थक किंवा खलिस्तानी चळवळींशी संबंधित व्यक्तींवर कुठलीही कारवाई कॅनडा सरकारकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे कॅनडा सरकार हे खलिस्तान्यांच्या ताटाखालचे मांजर असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App