विशेष प्रतिनिधी
लखनऊ : भाजपला दुर्गंध पसंत म्हणून ते गोशाळा बांधतात, अशी मुक्ताफळे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उधळली, तर समाजवादी पार्टी आता अंताच्या निकट आली आहे म्हणूनच अखिलेश तसे बरळू लागलेत, असा टोला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी हाणला.
भारतातली अत्तर नगरी कन्नौज मध्ये बोलताना अखिलेश यादव यांची जीभ घसरली. भाजपला दुर्गंध पसंत आहे म्हणून ते गोशाळा बांधतात समाजवादी पार्टीला सुगंध पसंत आहे म्हणून आम्ही अत्तर पार्कची निर्मिती केली, असे अखिलेश यादव म्हणाले. त्या पलीकडे जाऊन पत्रकारांना त्यांनी तुम्हाला जे काही लाभ घ्यायचे ते भाजपकडून घ्या पण नंतर भाजपला हटवा असेही प्रलाप उधळले.
अखिलेश यादव यांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांना ठोकून काढले. अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंग यादव पहिलवान होते. त्यांच्याकडे गाई गुरांचा गोठा होता. ते शेतकरी होते. अखिलेश यादव यांनी आपल्या पूर्वजांनाच नाव ठेवलीत, असे शरसंधान प्रेम शुक्ला यांनी साधले.
त्यापलीकडे जाऊन केशव प्रसाद मौर्य यांनी अखिलेश यादव यांना सुनावले. ज्यावेळी एखादा शेतकऱ्याच्या किंवा गवळ्याच्या मुलाला गायीच्या गोठ्यातून दुर्गंध यायला लागतो, तेव्हा समजायचे की तो आपल्या पूर्वजांना आणि जमिनीला विसरलाय. मुन्शी प्रेमचंद म्हणायचे, जेव्हा शेतकरी पुत्र जमिनीला विसरतो, तेव्हा समजायचे दुष्काळ पडणार. अखिलेश यादव यांना गाईच्या गोठ्यातून दुर्गंध यायला लागलाय, याचा अर्थ समाजवादी पार्टी अंताकडे निघाली आहे हे समजून चालायला हरकत नाही असा टोला केशव प्रसाद मौर्य यांनी हाणला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App