वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर दिल्लीतील भाजप नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सीएम केजरीवाल यांना सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर ट्रोल केले जात आहे. केजरीवाल यांनी देशाचा पंतप्रधान सुशिक्षित असणे गरजेचे असल्याचे वक्तव्य केले होते.Kejriwal said – Prime Minister of the country needs to be educated, BJP’s counterattack – I don’t think you have passed IIT!
भाजप नेते म्हणाले- आकाशावर थुंकलेले स्वत:वरच पडते
विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी म्हणाले, केजरीवालांनी थोडी लाज बाळगावी! ज्या व्यक्तिमत्त्वाला सारे जग मानत आहे आणि स्तुती करताना थकत नाही, अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल असे बोलणे तुमची कोती मानसिकता दर्शवते. आभाळावर थुंकलेले स्वतःवरच पडते. ते पुढे म्हणाले की, जनता जेव्हा कोरोनाने मरत होती, तेव्हा सिसोदिया यांच्यासमवेत ते दारू व्यावसायिकांशी भ्रष्टाचार करण्यासाठी दारू धोरण तयार करत होते.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुम्ही आयआयटी पास आहात, यावर विश्वास बसत नाही. थाळी वाजवणे हे कोरोना वॉरियर्सचे कौतुक करण्यासाठी होते, कोरोनाला पळवून लावण्यासाठी नव्हते.
माजी केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव लोकनेते आहेत, ज्यांच्या हाकेवर देश एकत्र येतो. ही तुमची एकमेव समस्या आहे. अरविंद केजरीवाल, राजकारणात इतकेही खाली घसरू नका की कोविडच्या काळात स्वतःची चिंता बाजूला ठेवून कर्तव्य बजावत असलेल्या योद्ध्यांच्या सन्मानाची तुम्हाला पर्वा नाही.
भाजप नेते नीलकांत बक्षी म्हणाले की, केजरीवाल विपश्यना करतात किंवा ध्यान करतात तरीही ते अत्यंत उद्धटपणे बोलतात, ही विपश्यनेसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे.
मंत्र्यांच्या अटकेवरून तणाव
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी मध्य प्रदेशमध्ये आयोजित पक्ष कार्यकर्ता परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वादग्रस्त टिप्पणी केली. केजरीवाल यांनी त्यांचे दोन सहकारी मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांची अटक आणि नोटाबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली.
माझ्या दोन हुशार मंत्र्यांना अटक केली, असे केजरीवाल म्हणाले. एक म्हणजे सतेंद्र जैन, ज्यांनी दिल्लीला वीज, उपचार आणि औषधे मोफत दिली आणि मोहल्ला दवाखाने बांधले. पंतप्रधानांनी त्यांना तुरुंगात टाकले. दुसरे म्हणजे मनीष सिसोदिया आहेत, ज्यांनी दिल्लीत गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण दिले, त्यांनाही पंतप्रधानांनी तुरुंगात पाठवले. देशाचा पंतप्रधान शिक्षित असणे आवश्यक आहे, कारण कमी शिकलेल्या पंतप्रधानाला कोणीही मूर्ख बनवू शकतो. आता या वक्तव्यावरूनच केजरीवाल यांना ट्रोल केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App