
जाणून घ्या , काय आहे संपूर्ण प्रकरण
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या दुसऱ्या तक्रारीवर राऊस एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना १६ मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.Kejriwal ordered to appear in court on March 16 in new trouble
अबकारी धोरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीत समन्सचे पालन न केल्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्याची विनंती करणारी ईडीने राऊस एव्हेन्यू न्यायालयात नवीन तक्रार दाखल केली आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, नवीन तक्रार आम आदमी पार्टी (आप) चे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांना फेडरल प्रोब एजन्सीद्वारे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्ट (PMLA) च्या कलम 50 अंतर्गत पाठवलेल्या समन्स क्रमांक 4 ते 8 चे पालन न करण्याशी संबंधित आहे.
याआधीही, ईडीने राऊस एव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल करून केजरीवाल यांना जारी केलेल्या पहिल्या तीन समन्सवर हजर न राहिल्याबद्दल त्यांच्यावर खटला चालवण्याची मागणी केली होती. ईडीच्या पहिल्या तक्रारीवर राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना 16 मार्च रोजी समन्स बजावले होते.
Kejriwal ordered to appear in court on March 16 in new trouble
महत्वाच्या बातम्या
- जुल्फीकार अली भुट्टो गेले जीवानिशी; 44 वर्षांनी पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने चुकीची ठरवली फाशी!!
- जरांगेंचे आंदोलन + वंचितच्या सूचनांवर महाविकास आघाडीचे नेते गप्प; वंचितच्या नेत्याकडूनच आघाडीची बैठक “एक्सपोज”!!
- शहाजहान शेखला CBI कोठडी, वैद्यकीय तपासणीनंतर CIDच्या ताब्यात!
- खासदार नवनीत राणांना व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याची धमकी!