
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर आणि त्यावर आता सुप्रीम कोर्टानेही शिक्कामोर्तब केल्यानंतर पिसाळलेले जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रातल्या मोदी सरकारलाच धमकी दिली आहे. तुम्ही पाकिस्तानबरोबर चर्चा सुरू केली नाहीत, तर जम्मू-काश्मीरमध्ये गाझा आणि पॅलेस्टाईन सारखाच रक्तपात होईल, अशी ही धमकी आहे.Kashmir will turn into Gaza, Palestine if there’s no dialogue between India & Pakistan: Farooq Abdullah
अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, तुम्ही मित्र बदलू शकता पण शेजारी बदलू शकत नाही. पाकिस्तान आपला मित्र नसेल, पण शेजारी आहे. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तान सरकारशी चर्चा केलीच पाहिजे. पाकिस्तान मध्ये नवाज शरीफ पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर आहेत. त्यांनी भारताशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे मग भारत सरकारच आपली अडेल भूमिका का टिकवून आहे??, असा सवाल अब्दुल्लांनी केला आणि त्याचवेळी पाकिस्तानची चर्चा केली नाही, तर जम्मू – काश्मीरमध्ये गाझा आणि पॅलेस्टाईन सारखाच रक्तपात होईल, अशी धमकी दिली.
मोदी सरकारची ठाम भूमिका
दहशतवाद थांबवल्याशिवाय पाकिस्तानशी कुठलीही चर्चा नाही, अशी ठाम भूमिका मोदी सरकारने घेतली. त्याचबरोबर जम्मू -काश्मीर मधले 370 कलम देखील हटवून जम्मू – काश्मीरचे विभाजन करून लडाख आणि जम्मू – काश्मीर हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार केले. त्यामुळे डॉ. फारूक अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती हे दोन नेते आधीच पिसाळले आहेत. त्यातूनच त्यांच्या जम्मू काश्मीरचे गाझा आणि पॅलेस्टाईन मध्ये रूपांतर होईल, अशा या धमक्या देणे त्यांनी सुरू केले आहे. ही पाकिस्तानला चिथावणीच आहे.
Kashmir will turn into Gaza, Palestine if there’s no dialogue between India & Pakistan: Farooq Abdullah
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंना सत्ता गेल्याने काय बोलावं हेच कळत नाही; राम मंदिराच्या टीकेवरून नारायण राणेंनी घेतला समाचार
- आता लोकसभा निवडणुका झाल्या तर सरकार कोणाचे येणार? सर्वेक्षणात इंडिया-एनडीएला किती जागा? पाहा आकडेवारी
- पक्ष वाढवायचा की मोदी घालवायचा??, हे ठरवा, नाहीतर तेच बोकांडी बसतील; प्रकाश आंबेडकरांचा मविआच्या नेत्यांना इशारा!!
- पंडित धीरेंद्र शास्त्री लवकरच लग्न करणार; लग्नासाठी येत आहेत भावनिक पत्रे, राम मंदिरावरही केले वक्तव्य
Array