‘…तर काश्मीरचेही गाझासारखेच हाल होईल’, भारत-पाकिस्तानचा उल्लेख करताना फारूख अब्दुल्लांचं विधान!

जाणून घ्या अब्दुल्ला यांनी असं का म्हटलं आहे?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पूंछ दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी मोठे वक्तव्य करत भारत-पाकिस्तान चर्चेची बाजू मांडली आहे. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, जर भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा झाली नाही तर जम्मू-काश्मीरची अवस्था गाझासारखी होईल.Kashmir will also suffer the same fate as Gaza Farooq Abdullahs statement while referring to India Pakistan



”जर आपण चर्चेतून तोडागा काढू शकलो नाही, तर आमचेही तेच हाल होतील. जे गाझा आणि पॅलेस्टाईनचे होत आहेत. ज्यांच्यावर इस्रायल बॉम्बवर्षाव करत आहे.” असं अब्दुल्ला म्हणाले आहेत.

ANI या वृत्तसंस्थेनुसार, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी मंगळवारी सांगितले की, जर भारत आणि पाकिस्तानने चर्चेद्वारे वाद संपवले नाहीत, तर काश्मीरचेही गाझा आणि पॅलेस्टाईनसारखेच भवितव्य होईल.

वास्तविक, फारुख अब्दुल्ला गेल्या आठवड्यात पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत होते, ज्यात भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले होते आणि इतर जखमी झाले होते.

Kashmir will also suffer the same fate as Gaza Farooq Abdullahs statement while referring to India Pakistan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub