…म्हणून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग

अन् वैमानिकाने तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोल वाराणसीशी संपर्क साधला


विशेष प्रतिनिधी

पाटणा : दरभंगा-मुंबई स्पाईसजेटच्या विमानातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वाराणसीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. कलावती देवी (85) असे संबंधित महिलेचे नाव असून स्पाईसजेटच्या एसजी 116 या फ्लाइटमधून दरभंगाहून मुंबईला जात होत्या. सोमवारी संध्याकाळी 5.40 वाजता दरभंगा विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली.Emergency landing of Mumbai bound plane in Varanasi



तोपर्यंत विमान उत्तर प्रदेशच्या हवाई हद्दीजवळ पोहोचले होते, त्यामुळे वैमानिकाने तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) वाराणसीशी संपर्क साधून आपत्कालीन लँडिंगची परवानगी घेतली.

सोमवारी संध्याकाळी 6 वाजता विमान वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले तेव्हा पीडितेला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अखेर सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजता वाराणसीहून विमान मुंबईसाठी रवाना झाले.

Emergency landing of Mumbai bound plane in Varanasi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात